वाहतूक नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:04+5:302021-01-02T04:09:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत असून, त्यात निरपराधांचा मृत्यू हाेताे. याला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने वाहन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत असून, त्यात निरपराधांचा मृत्यू हाेताे. याला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने वाहन चालिवताना वाहतूक नियमांचे काटेकाेर पालन करावे. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा तसेच दारू पिऊन वाहने चालवू नये. असा प्रत्येकाने नवीन वर्षाचा संकल्प करावा, असे आवाहन कळमेश्वरचे ठाणेदार आसिफराजा शेख यांनी गुरुवारी (दि. ३१) वाहनचालकांशी संवाद साधताना केले.
रस्ते अपघात आणि त्यात जखमी अथवा मृत हाेणे ही गंभीर समस्या बनली आहे. ही समस्या मानवनिर्मित असल्याने वाहने चालविताना घरी आपली कुणीतरी वाट बघत आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवावे. रस्ते अपघातमुक्त जीवन जगणे ही प्रत्येकाने जीवनशैली करावी. त्यासाठी वाहतूक नियमांचे काटाेकाेर पालन करावे. दारू पिऊन अथवा काेणतीही नशा करून वाहने कधीच चालवू नये, असा सल्लाही त्यांनी वाहनचालकांना व इतर नागरिकांना दिला.
याप्रसंगी रस्ता सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष राजू वाघ, राष्ट्रीय उपाध्यक्ष अमन बोरे, अपघात मुक्त भारतचे डॉ. राज दिवाण, जीवन सुरक्षा प्रकल्पाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. प्रशांत घाटे, १०८ या सेवेचे विभागीय व्यवस्थापक शंकर पाल उपस्थित होते. यशस्वितेसाठी शुभम अहीरकर, रोहित कुरळकर, खुशाल मंडलिक, दिनेश वरवळे, निखिल लामसे, आदित्य तरार, चेतन घुमळे, मल्हार बोरे, तनीश तेलेवार, स्वाती कोल्हे, श्वेता हनवते यांवी सहकार्य केले.