फोनी वादळ : कोलकाता-नागपूर दोन विमाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:25 AM2019-05-04T00:25:53+5:302019-05-04T00:27:06+5:30

फोनी वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकल्यामुळे कोलकाता आणि हल्दिया विमानतळ शुक्रवारी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोलकाता येथून नागपूरला येणारी इंडिगो एअरलाईन्सची दोन विमाने रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे.

Fonni storm: Kolkata-Nagpur two Flight canceled | फोनी वादळ : कोलकाता-नागपूर दोन विमाने रद्द

फोनी वादळ : कोलकाता-नागपूर दोन विमाने रद्द

Next
ठळक मुद्देचेन्नईचे विमान वळविले : दोन विमाने ‘लेट’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फोनी वादळ पश्चिम बंगालमध्ये धडकल्यामुळे कोलकाता आणि हल्दिया विमानतळ शुक्रवारी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कोलकाता येथून नागपूरला येणारी इंडिगो एअरलाईन्सची दोन विमाने रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे.
इंडिगोची ६ई४०४ आणि ६ई६६३ ही दोन्ही कोलकाता-नागपूर विमाने अनुक्रमे रात्री ८ आणि रात्री १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येतात. पण फोनी वादळामुळे रद्द करण्यात आली. कोलकाता विमानतळावरून शनिवारी ६ वाजेपर्यंत विमानांची ये-जा बंद राहणार आहे. याशिवाय चेन्नईहून दुपारी ३.३० वाजता नागपुरात येणारे विमान तांत्रिक कारणांमुळे हैदराबादला वळविण्यात आले. हे विमान चेन्नई येथून १.४५ वाजता रवाना होते. पण शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता नागपुरात आले आणि ६.४५ वाजता चेन्नईकडे रवाना झाले. तसेच इंडिगोचे ६ई४३६ इंदूर-नागपूर विमान ३७ मिनिटे उशिरा रात्री ८.३२ वाजता आणि गो एअरचे जी-८ २५१९ दिल्ली-नागपूर विमान २९ मिनिटे उशिरा अर्थात रात्री ९.२४ वाजता पोहोचले. त्यामुळे नागपुरातून देशाच्या अन्य शहरांमध्ये उड्डाण भरणाऱ्या विमानांना उशीर झाला.

Web Title: Fonni storm: Kolkata-Nagpur two Flight canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.