नागपुरात लॉकडाऊन काळात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : १ कोटीचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 08:05 PM2020-06-03T20:05:52+5:302020-06-03T20:07:50+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात अन्न व औषध प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून १७५ आस्थापनांना भेटी दिल्या. त्यापैकी २ पेढ्यांना स्वच्छतेच्या कारणास्तव विक्री बंद करण्याचे आदेश पारित केले. तसेच ७६ अन्न नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. संचारबंदीच्या काळात सुपारी, तेलासह प्रतिबंधित अन्नपदार्थांवर धाड टाकून जवळपास १ कोटीचा माल जप्त केला.

Food and Drug Administration cracks down on lockdown in Nagpur: 1 crore worth of goods seized | नागपुरात लॉकडाऊन काळात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : १ कोटीचा माल जप्त

नागपुरात लॉकडाऊन काळात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई : १ कोटीचा माल जप्त

Next
ठळक मुद्देसुपारी, तेलासह प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात अन्न व औषध प्रशासनाने नागपूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून १७५ आस्थापनांना भेटी दिल्या. त्यापैकी २ पेढ्यांना स्वच्छतेच्या कारणास्तव विक्री बंद करण्याचे आदेश पारित केले. तसेच ७६ अन्न नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. संचारबंदीच्या काळात सुपारी, तेलासह प्रतिबंधित अन्नपदार्थांवर धाड टाकून जवळपास १ कोटीचा माल जप्त केला.
या कालावधीत रिफाईन्ड सोयाबीन तेल सुमारे ९७२ किलो किंमत १ लाख १६ हजार ६१६ रुपये, रिफाईन्ड सूर्यफूल तेल २५८ किलो किंमत २७ हजार ८३७ रुपये, सुपारी सुमारे २८,९७९ किलो किंमत ९३ लाख ५८ हजार ९४५ रुपये तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थ ५१४ किलो किंमत ५ लाख १५ हजार ६१५ एवढ्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहआयुक्त अन्न यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षात जिल्ह्यात एकूण ९८८ अन्न आस्थापनांची तपासणी केली. ११ परवाने निलंबित केले. १३ प्रकरणे न्यायनिर्णयाकरिता दाखल करण्यात आले. २१,५०० रुपये दंड आकारला. १६ तडजोड प्रकरणात ३२ हजार रुपये तडजोड शुल्क वसूल केले. तसेच एकूण ५२१ अन्न नमुने तपासणीस्तव घेण्यात आले, त्यापैकी ८४ नमुने कमी दर्जाचे आढळून आले व ६२ नमुने असुरक्षित आढळून आले. ९ कमी दर्जा प्रकरणी ४६ हजार रुपये तडजोड शुल्क आकारले. ८६ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते, त्यापैकी १२ नमुने कमी दर्जाचे आढळून आले होते. १२ कमी दर्जा नमुन्यापैकी ३ प्रकरणात १३ हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. प्रतिबंधित अन्नपदार्थ प्रकरणी ८७ आस्थापनांची तपासणी केली ४८ ठिकाणी एकूण १ कोटी २३ लक्ष ७६ हजार १६५ किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त केला. ३५ प्रकरणी एफआयआर दाखल केला. २२ प्रकरणी न्यायालयात खटले दाखल केले. याच कालावधीत जिल्ह्यात सुपारीचे एकूण ३८ नमुने विश्लेषणासाठी घेऊन तब्बल ५,३२,६०० किलो, म्हणजे १० कोटी ५० लक्ष ४६ हजार ९७७ रुपये किमतीचा साठा जप्त केला.

Web Title: Food and Drug Administration cracks down on lockdown in Nagpur: 1 crore worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.