सक्ती आहे,पण धास्ती नाही!

By admin | Published: February 4, 2016 02:44 AM2016-02-04T02:44:01+5:302016-02-04T02:44:01+5:30

राज्यात सर्वत्र लवकरच दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी औरंगाबादमध्ये केली.

Is forced, but not scared! | सक्ती आहे,पण धास्ती नाही!

सक्ती आहे,पण धास्ती नाही!

Next

जानेवारीत २५१७ वाहनधारकांवर कारवाई : शहरात १२ लाख दुचाकींची संख्या
नागपूर : राज्यात सर्वत्र लवकरच दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी औरंगाबादमध्ये केली. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मात्र, सर्वत्र याची अंमलबजावणी होत नाही. आता हा नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षी शहरात १२५४ अपघात झाले असून यात २६० जणांचा मृत्यू झाला आहे तर १२३३ जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्ते अपघातांची दखल घेत राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ रोजी परिपत्रक काढून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात मोटरसायकलस्वार आणि त्याच्या मागे बसणाऱ्यास हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. हेल्मेट न घातल्यास आर्थिक दंडाबरोबर दोन तासांचे वाहतूक नियमांसंदर्भात समुपदेशन करण्यात येणार आहे. मात्र गेल्या महिनाभरात या नियमांची काटेकोरपणे सक्ती झाली नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, नागपुरात १४ लाख ५८ हजार वाहनांमधून दुचाकी वाहनांचीच संख्या १२ लाखांवर आहे. यामुळे हेल्मेटची सक्ती करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. (प्रतिनिधी)

हेल्मेट नसल्यास चारपट गतीने लागतो मार
मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु हेल्मेट नसल्यास ४५ किमी प्रतितासाच्या वेगाने चालणाऱ्या मोटारसायकलीवरून चालक खाली पडल्यास चारपट गतीने मार लागतो. यात डोक्याचे हाड तुटण्याची शक्यता सर्वाधिक असते, असे जागतिक स्तरावर दुचाकी वाहनांच्या अपघातात केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.तज्ज्ञाच्या मते, सामान्य अवस्थेत उभे राहून खाली पडल्यावर डोक्याला सुमारे ३ किलोग्राम वजनापर्यंत मार लागण्याची शक्यता असते. परंतु चालत्या मोटारसायकलीवरून विना हेल्मेट खाली पडल्यास १२ ते १७ किग्रापर्यंत (इम्पॅक्ट लोड) धडक लागण्याची शक्यता असते. मात्र याच गतीमध्ये इम्पॅक्ट लोडला हेल्मेट ७ किग्रापर्यंत करते. एवढे वजन डोक्याचे हाड सहन करू शकते आणि वाहन चालक वाचू शकतो.

Web Title: Is forced, but not scared!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.