विदेशी उड्डाणांनी येणारे प्रवासी त्रस्त : कस्टम व इमिग्रेशनच्या तपासणीला जास्त वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:20 PM2019-05-09T23:20:50+5:302019-05-09T23:21:45+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजाह आणि दोहा येथून नागपुरात येणारी विमाने पहाटे अनुक्रमे ४.१० आणि ४.२५ वाजता येतात. या विमानातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणीच्या नावाखाली त्रास होत आहे. अनेक तासांचा प्रवास करून नागपुरात आल्यानंतर कस्टम आाणि इमिग्रेशनच्या तपासणीसाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजाह आणि दोहा येथून नागपुरात येणारी विमाने पहाटे अनुक्रमे ४.१० आणि ४.२५ वाजता येतात. या विमानातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणीच्या नावाखाली त्रास होत आहे. अनेक तासांचा प्रवास करून नागपुरात आल्यानंतर कस्टम आाणि इमिग्रेशनच्या तपासणीसाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागत आहे.
जास्त उड्डाणे असल्यास तपासणीला जास्त कालावधी लागत असेल तर ही त्रास होण्याची बाब मान्य आहे. पण केवळ दोनच उड्डाणे असताना तपासणीसाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. सूत्रांनी सांगितले की, या ठिकाणी संशोधनांची कमतरता आहे. नागपूर विमानतळ हे नावाचेच इंटरनॅशनल आहे, पण आधुनिकीकरण पद्धतीने तपासणीची सुविधा अजूनही करण्यात आलेली नाही. यामुळेच फिजिकल फ्रीस्किंग आणि स्क्रीनिंग परंपरागत पद्धतीने करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी पेस्ट स्वरूपात पकडण्यात आलेल्या सोने तस्करीच्या प्रकरणावर प्रकाश टाकल्यास संदिग्ध व्यक्तींची चौकशी केल्यानंतर शरीराचा एक्स-रे काढण्यासाठी कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागली होती. जर विमानतळावर बॉडी स्कॅनर मशीन असती तर या प्रक्रियेसाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज भासली नसती आणि ही प्रक्रिया कमी वेळेत पार पडली असती. ही सुविधा विमानतळावर असावी, यावर एकमत असले तरीही आधुनिक यंत्रणा लावण्यासाठी जवळपास दोन वर्षें लागणार आहे.
तपासणीला जास्त कालावधी लागत असल्यामुळे प्रवासी त्रस्त होतात, या बाबीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. केवळ प्रवासी या दृष्टिकोनातून त्यांची तपासणी करण्यात येते. त्याकरिता कोणतेही लक्ष्य वा दबाव नसतो. नियमानुसार सर्वांची तपासणी करण्यात येते. प्रवाशांनी निर्धारित वस्तूंच्या संदर्भात माहिती ठेवली पाहिजे. संबंधित यादी आगमन द्वारावर लावण्यात आली आहे.