परदेशी शिष्यवृत्तीचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:08 AM2021-07-08T04:08:12+5:302021-07-08T04:08:12+5:30
नागपूर : अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून १ ऑगस्टपर्यंत करण्यात ...
नागपूर : अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून १ ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात अध्ययनासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी जागतिकस्तरावर ३०० च्या आतील रँकमध्ये परदेशी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी डब्ल्यू.डब्ल्यू.डब्ल्यू.महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करावा व हा अर्ज एस.डब्ल्यू. एफ. एस. अप्लीकेशन्स. २१२२ ॲट जीमेल डॉट कॉम या मेलवर पाठवावा. त्याची हार्डकॉपी पोस्टाने समाजकल्याण आयुक्तालय, पुणे, या पत्त्यावर पाठविण्यात यावी.
या योजनेच्या अटी व शर्ती आणि लाभाचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच अनुज्ञेय राहील. अर्जाचा नमुना व सविस्तर माहितीसाठी डब्ल्यू.डब्ल्यू.डब्ल्यू.महाराष्ट्र डॉ. जीओव्ही डॉ. इन या संकेतस्थळावर रोजगार या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.
-----------