परदेश शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रियेस ५ जुलैपर्यंत मुदतवाढ
By आनंद डेकाटे | Published: June 21, 2023 04:10 PM2023-06-21T16:10:17+5:302023-06-21T16:10:48+5:30
अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
नागपूर : सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीसाठी आता ५ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होय.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत ही २० जुन पर्यंत होती परंतु अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली असून आता अर्ज ५ जुलै पर्यंत स्वीकारता येतील. तरी इच्छुकांनी परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत व आवश्यक ते कागदपत्रासह, समाज कल्याण आयुक्तालय ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे या पत्यावर सादर करावा.
-