आता नागपूर विद्यापीठात येणार नाहीत विदेशी विद्यार्थी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:18 PM2018-10-24T23:18:47+5:302018-10-24T23:19:53+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यापुढे एकही विदेशी विद्यार्थी अध्ययनासाठी येणार नाही असे स्वप्नच जणू प्रशासनाला पडले आहे. म्हणूनच की काय विदेशी विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेल्या ‘नेल्सन मंडेला’ विदेशी विद्यार्थी वसतिगृहाचे नावच बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच या वसतिगृहात आता ‘पीएचडी’ संशोधकांनादेखील प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी यासंदर्भात विधिसभेच्या बैठकीत बुधवारी घोषणा केली.

Foreign Students will not come to Nagpur University now? | आता नागपूर विद्यापीठात येणार नाहीत विदेशी विद्यार्थी ?

आता नागपूर विद्यापीठात येणार नाहीत विदेशी विद्यार्थी ?

Next
ठळक मुद्देविदेशी विद्यार्थ्यांचे वसतिगृह ‘पीएचडी’ संशोधकांना : विधिसभेत कुलगुरूंची घोषणा

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यापुढे एकही विदेशी विद्यार्थी अध्ययनासाठी येणार नाही असे स्वप्नच जणू प्रशासनाला पडले आहे. म्हणूनच की काय विदेशी विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आलेल्या ‘नेल्सन मंडेला’ विदेशी विद्यार्थी वसतिगृहाचे नावच बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच या वसतिगृहात आता ‘पीएचडी’ संशोधकांनादेखील प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी यासंदर्भात विधिसभेच्या बैठकीत बुधवारी घोषणा केली. यापुढे वसतिगृहाचे नाव नेल्सन मंडेला संशोधक भवन असे राहणार आहे.
विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांसाठी १९९७ साली नेल्सन मंडेला विदेशी विद्यार्थी वसतिगृहाचे निर्माण केले होते. त्यावेळी विद्यापीठात शेकडो विदेशी विद्यार्थी अभ्यासासाठी यायचे. मात्र विद्यापीठाच्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली. ही स्थिती सुधारण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून कुठलीही पावले उचलण्यात आली नाही. वसतिगृहाची अवस्थादेखील अतिशय दयनीय झाली होती.
अखेर काही काळापूर्वी या वसतिगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र विदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने चालू शैक्षणिक वर्षात येथे ‘पीएचडी’ संशोधकांना राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या इतर वसतिगृहांच्या तुलनेत येथे जास्त शुल्क ठेवण्यात आले आहे. संशोधकांना येथे राहण्यासाठी १२ हजार रुपयांचे शुल्क द्यावे लागेल. बुधवारी विधिसभेच्या बैठकीत सदस्यांनी हे शुल्क कमी करण्याची मागणी लावून धरली. मात्र खर्चाचा हवाला देत ही मागणी मान्य करण्यास प्रशासनाने नकार दिला.

Web Title: Foreign Students will not come to Nagpur University now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.