वणवा नियंत्रणासाठी वन अकादमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:36 AM2018-05-31T01:36:30+5:302018-05-31T01:36:40+5:30
वनांमध्ये वणवा पेटणे ही नवीन बाब नाही. प्राचीन काळापासन ते सुरु आहे. परंतु जंगलातील या आगीमुळे हजारो हेक्टरचे नुकसान होेते. त्यामुळे सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चंंद्रपूर येथे वन वणवा अकादमी स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनांमध्ये वणवा पेटणे ही नवीन बाब नाही. प्राचीन काळापासन ते सुरु आहे. परंतु जंगलातील या आगीमुळे हजारो हेक्टरचे नुकसान होेते. त्यामुळे सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चंंद्रपूर येथे वन वणवा अकादमी स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
ही अकादमी ही राज्यस्तरीय आपत्ती निवारण यंत्रणेद्वारे उभारण्यात येईल. आग लागताच त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम यामार्फत केले जाईल. यापूर्वी हजार बाय हजार चौरस मीटरमध्ये लागलल्या आगीचीच नोंद करण्यात येत होती. त्यामुळे लहान आगीकडे कुणाचेच लक्ष नव्हते. परिणामी त्याच्या नियंत्रणासाठी ही करता येत नव्हते. आता ३०० बाय ३० मीटरच्या क्षेत्रात लागणाऱ्या आगीचीही नोंद होणार आहे. वणवा अकादमीच्या माध्यमातून यावर नियंत्रण मिळविता येईल. यासाठी आवश्यक गार्ड, आणि ड्रोन व इतर अत्याधुनिक यंत्रसामुग्रीही आणली जाईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
काळ्या बिबट्याबाबत चौकशी सुरु
सह्याद्रीच्या पठारातही कही जणांना काळा बिबट आढळून आला होता. त्यामुळे चंद्रपूरमधील ताडोबा जंगलात आढळून आलेल्या काळ्या बिबटाबाबत शस्त्रीय अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे वनमंत्री मुनगंटीवर यांनी सांगितले. तसेच कऱ्हांडला येथील जयचंदबाबत त्यांनी संगितले की, वाघाचे क्षेत्र १२ बाय १२ चौरस किमीचे असते. एका मर्यादेनंतर तो आपले मतदार क्षेत्र बदलतो. जयचंद इतर क्षेत्रात जाण्याची शक्यता आहे. त्याचा तपास सुरू आहे.
‘वाघा'चे संवर्धन, युतीचे संकेत
सध्या सत्ताधारी भाजप आणि शिवसनेमध्ये ‘वाक्’युद्ध सुरू असून सेनेकडून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडण्यात येत नाही. दुसरीकडे शिवसेनेकडून येणारी निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर केले असले तरी भाजपकडून मात्र युतीची भाषा होत आहे. यासंदर्भात मुनगंटीवार यांना युतीमधील वाघ (शिवसेना) भाजपाला त्रास देत अल्याबद्ल विचारणा केली वाघाचे संवर्धन करण्याचेच काम आमचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सहकार्यच राहील. वाघाचे संवर्धन होईल. ते आम्ही करूच. थोडा वेळ लागेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भूमिका सांगितली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दिसेल, असे म्हणत मुनगंटीवार यांनीही अप्रत्यक्षरीत्या सेनेसोबत युती होणार असल्याचे संकेत दिले.