अपघातात वनपालाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:56+5:302021-06-23T04:06:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : भिवापूरमार्गे लाखांदूर येथे दुचाकीने जात असताना उमरेडच्या दिशेने भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनचालकाने दुचाकीला जाेरात ...

Forest ranger killed in accident | अपघातात वनपालाचा मृत्यू

अपघातात वनपालाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : भिवापूरमार्गे लाखांदूर येथे दुचाकीने जात असताना उमरेडच्या दिशेने भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनचालकाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार वनपालाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य एक वनपाल गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना उमरेड-भिवापूर महामार्गावरील नवेगाव (साधू) शिवारात मंगळवारी (दि.२२) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

कैलास रामकृष्ण पिल्लेवान (५६, रा. शिक्षक वसाहत, उमरेड) असे मृत वनपालाचे नाव असून, ते भंडारा वनविभागांतर्गत लाखांदूर वनपरिक्षेत्रात वनपाल पदावर कार्यरत हाेते. त्यांच्यासमवेत दुचाकीवर असलेले ज्ञानदेव श्रीपत राऊत (५४, रा. गिरडकर ले-आऊट, उमरेड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे. गौरव धनराज कुळमेथे (२१, रा. चामोर्शी, जि. गडचिराेली) असे आराेपी वाहनचालकाचे नाव असून त्यास अटक केली आहे. उमरेड निवासी कैलास पिल्लेवान हे वनरक्षक म्हणून दक्षिण-उमरेड वनपरिक्षेत्रात कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना लाखांदूर वनपरिक्षेत्रात वनपाल पदावर बढती मिळाली. अधेमध्ये सुटीच्या निमित्ताने ते ज्ञानदेव राऊत यांच्यासह ये-जा करायचे. राऊत हेसुद्धा भंडारा वनपरिक्षेत्रात वनपाल पदावर कर्तव्यावर होते.

मंगळवारी सकाळीच बढतीबाबतची दस्ताऐवज उमरेड कार्यालयात पोहोचवीत दोघेही एमएच-४०/एक्स-८५६५ क्रमांकाच्या दुचाकीने लाखांदूर येथे निघाले हाेते. दरम्यान, गडचिरोली येथून नागपूरकडे जाणाऱ्या एमएच-३४/एए-९३११ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने कैलास पिल्लेवान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर ज्ञानदेव राऊत गंभीर जखमी झाले असून, त्यांना नागपूरला रवाना केले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनचालकाने ओव्हरटेक केल्याचे आणि सुसाट वेगाने वाहन चालविल्याची बाब पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी सांगितली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी आराेपी वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ अ, १८४ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे.

....

शवविच्छेदनासाठी प्रतीक्षा

सदर अपघात झाल्यानंतर कैलास पिल्लेवान यांचा मृतदेह उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात सकाळी ११ वाजताच्या सुमारास शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तत्पूर्वी एका मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू होते. कैलास पिल्लेवान यांचा मृतदेह नेल्यानंतर डॉक्टर हजर नाहीत. दुसरे डॉक्टर येतील आणि शवविच्छेदन करतील, असे रुग्णालयाच्यावतीने नातेवाईकांना सांगण्यात आले. तब्बल चार तासाच्या प्रतीक्षेनंतर शवविच्छेदन करण्यात आले. अनेक लोकप्रतिनिधींना ही बाब कळविली. त्यानंतरही रुग्णालयाचा कारभार अत्यंत खेदजनकच होता. रुग्णालयाच्या या ढिम्म कारभारावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या जैबुन्निसा शेख यांनी केली आहे.

Web Title: Forest ranger killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.