टपाल कार्यालयांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून बनावट नियुक्तीपत्र
By आनंद डेकाटे | Updated: July 19, 2024 16:45 IST2024-07-19T16:44:56+5:302024-07-19T16:45:25+5:30
Nagpur : पोस्ट मास्टर जनरल यांनी नागरिकांना केले सतर्क, सावध राहण्याचे आवाहन

Forged appointment letter as data entry operator in post offices
आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काही बोगस कंपन्या स्वतःला केंद्र शासनाच्या नीती आयोग अंतर्गत एक स्वायत्त संस्थाचा बनाव करून नागपूर शहर विभागातील टपाल कार्यालयांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून बनावट नियुक्तीत्रासह काही व्यक्तींना पाठवत आहेत असे पोस्ट मास्टर जनरल नागपूर क्षेत्र यांच्या निदर्शनास आले आहे.
पोस्टमास्टर जनरल नागपूर क्षेत्र कार्यालयाच्या वतीने असे स्पष्ट करण्यात आले आहे, टपाल विभागातील डाटा एन्ट्री ऑपरेटर संवर्गातील भरतीची अशी कोणतीही जाहिरात वर्तमानपत्रात होत नाही. त्यामुळे ज्या नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अशा भरतीबाबत कुठल्याही व्यक्तीला संपर्क साधला असेल तर त्यांनी सावधान आणि सतर्क राहावे अशा घटना निदर्शनास आल्यास पोस्टमास्टर जनरल, नागपूर क्षेत्र, शंकर नगर, नागपूर- ४४००१० फोन नंबर (०७१२-२५६०५१७ ) यांच्याशी संपर्क करावा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल करावे असे आवाहन पोस्टमास्टर जनरल नागपूर क्षेत्र कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.