एमटीडीसीला ‘मारबत महोत्सव’चा विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:08 AM2019-08-20T11:08:07+5:302019-08-20T11:11:02+5:30

नागपुरात मारबत महोत्सवाकडे महाराष्ट्र पर्यटन विभागाने (एमटीडीसी) कायम दुर्लक्ष केले आहे.

Forget MTDC's 'Marbat Festival'! | एमटीडीसीला ‘मारबत महोत्सव’चा विसर!

एमटीडीसीला ‘मारबत महोत्सव’चा विसर!

googlenewsNext
ठळक मुद्देपाच वर्षांपासून दुर्लक्षचविभागीय व मुख्य कार्यालयाचा ‘पहले आप’चा तिढा

प्रवीण खापरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात मारबत महोत्सव साजरा होतो. या परंपरेला १३५ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. याकडे महाराष्ट्र पर्यटन विभागाने (एमटीडीसी) कायम दुर्लक्ष केले आहे. २०१४ मध्ये कसेतरी लगबगीने या महोत्सवात तोंडदिखाऊपणा केला गेला, मात्र त्यानंतर पाच वर्षे लोटली. नागपूर-विदर्भाची विशेष ओळख असलेला मारबत महोत्सव एमटीडीसीच्या यादीतून गहाळ झाल्याचे दिसून येतो. गेल्या पाच वर्षांपासून एमटीडीसीचे नागपूर विभागीय कार्यालय आणि मुंबई येथे असणारे मुख्य कार्यालय यांच्यात मारबत महोत्सवासंदर्भात समन्वय झालेच नसल्याचे स्पष्ट होते.
दोन्ही कार्यालयांमध्ये विचारणा केली असता, दोन्ही कार्यालयांच्या व्यवस्थापकांकडून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात. विभागीय कार्यालयाकडे विचारणा केली असता, मुख्य कार्यालयाकडून महोत्सवाच्या तयारीसंदर्भातील कुठलीही सूचना आली नसल्याचे सांगितले जाते. तर, सूचना का दिली गेली नाही, अशी विचारणा मुख्य कार्यालयाकडे केली असता, जिथे महोत्सव आहे तेथील विभागीय कार्यालयाने प्रस्तावच पाठविला नसल्याने आम्ही कसा काय महोत्सवाबाबतचा निर्णय घेऊ, असे उत्तर दिले जाते. अशा दोन्ही कार्यालयांमध्ये असलेल्या ‘पहले आप’चा तिढा गेल्या पाच वर्षांत सुटलेला नाही. गेल्या वर्षीही अशीच उत्तरे देऊन २०१९ मध्ये महोत्सवात आमचा सहभाग नक्की राहील, अशी बतावणी दोन्ही कार्यालयांकडून करण्यात आली होती, मात्र तशी तयारी अद्याप तरी दिसून येत नाही.

विदर्भातील एकही उपक्रम नियमित नाही
एमटीडीसीतर्फे पर्यटन म्हणा वा महोत्सवाबाबत नियमितता दिसून येत नाही. पर्यटनाच्या बाबतीत सुरू केलेले नागपूर दर्शन आणि खाण पर्यटन केव्हाच थंडबस्त्यात गेले आहे. किमान लोकसहभागातून शतकांपासून सुरू असलेल्या महोत्सवात तरी सातत्याने सहभाग असायला हवा होता. मात्र, उदासीन धोरणामुळे तेथेही एमटीडीसी तुसडे धोरण अमलात आणत असल्याचे दिसून येते.

Web Title: Forget MTDC's 'Marbat Festival'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.