RSS च्या मोहन भागवतांची शरद बोबडेंनी घेतली भेट; तब्बल तासभर खलबतं, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:39 PM2021-09-01T14:39:06+5:302021-09-01T14:40:21+5:30

शरद बोबडे यांनी मोहन भागवत यांची औपचारिकपणे भेट घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

former chief justice of india sharad bobde meets rss chief mohan bhagwat in nagpur | RSS च्या मोहन भागवतांची शरद बोबडेंनी घेतली भेट; तब्बल तासभर खलबतं, चर्चांना उधाण

RSS च्या मोहन भागवतांची शरद बोबडेंनी घेतली भेट; तब्बल तासभर खलबतं, चर्चांना उधाण

Next

नागपूर:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागव आणि भारताचे माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची भेट झाली. शरद बोबडे यांनी RSS च्या मुख्यालयात जाऊन मोहन भागवत यांची औपचारिकपणे भेट घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. या भेटीदरम्यान या दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचे सांगितले जात असून, नेमका तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. (former chief justice of india sharad bobde meets rss chief mohan bhagwat in nagpur)

“सत्ता मिळाल्यावर हिंदुत्वाची भूमिका बदलणाऱ्याची घंटा जनता वाजवल्याशिवाय राहणार नाही”; मनसेचा पलटवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबद्दल काही माहिती नसल्याचे म्हटले आहे. मात्र, महल परिसरातील आरएसएस मुख्यालयात संध्याकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान बैठक झाली, असे सांगितले जात आहे. या दोघांमध्ये तासभर नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. तसेच सरसंघचालक मोहन भागवत किंवा माजी सरन्यायाधीश बोबडे या दोघांकडूनही या बैठकीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

“देवावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करू नका”; भाजपचा ठाकरे सरकारवर घणाघात

हेडगेवार यांच्या जुन्या घरालाही भेट 

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केबी हेडगेवार यांच्या जुन्या घरालाही भेट दिल्याची माहिती मिळाली आहे. शरद बोबडे यांनी भेट दिलेल्या घरात हेडगेवार यांचा जन्म झाला होता. शंभर वर्षांपेक्षा जास्त जुने असलेल्या या घराची काळजी कशाप्रकारे घेतली जात आहे, याबद्दल बोबडे यांनी जाणून घेतली, असे एका संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

“घंटानाद करा, आणखी काही करा; पण आमचा नाद करू नका”; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

दरम्यान, माजी सरन्यायाधीश बोबडे हे मूळचे नागपूरमधील आहेत. बोबडे यांनी अनेक वर्षे नागपूरमध्ये वकिली केली होती. शरद बोबडे या वर्षाच्या सुरुवातीला देशाचे सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर ते त्यांचा पूर्ण वेळ दिल्ली आणि नागपुरात घालवत आहेत, असे सांगितले जात आहे.
 

Web Title: former chief justice of india sharad bobde meets rss chief mohan bhagwat in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.