'नीरी'चे माजी संचालक व पर्यावरण जैवतंत्रज्ञ तपन चक्रवर्ती यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 10:04 PM2022-02-14T22:04:03+5:302022-02-14T22:04:28+5:30
Nagpur News ‘सीएसआयआर-नीरी’चे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती (७३) यांचे निधन झाले.
नागपूर : ‘सीएसआयआर-नीरी’चे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती (७३) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी व पत्नी डॉ. चंदा चक्रवर्ती आहेत. पर्यावरण जैवतंत्रज्ञ अशी त्यांची ओळख होती व त्यांनी या क्षेत्रात मौलिक योगदान दिले होते.
डॉ. चक्रवर्ती २००८ ते २०११ या कालावधीत नीरीचे कार्यकारी संचालक होते. त्यानंतर त्यांनी व्हीएनआयटी येथे चेअर प्रोफेसर म्हणूनदेखील जबाबदारी सांभाळली. जैवतंत्रज्ञान साधनांचा वापर करून विषारी सांडपाणी आणि घातक गाळ, दूषित स्थळांचे जैव-उपचार, कचऱ्यापासून मूल्यवर्धित रसायनांचे जैवतंत्रज्ञान उत्पादन, पर्यावरण निरीक्षण आणि पर्यावरण व्यवस्थापन या क्षेत्रात काम केले होते.