काटोल विधानसभेचे माजी आमदार सुनिल शिंदे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:38 AM2020-06-11T11:38:04+5:302020-06-11T11:38:28+5:30
काटोल विधानसभेचे माजी आमदार तसेच म्हाडा सभापती मा.श्री.सुनील शामरावजी शिंदे (८६)यांचे आज सकाळी काटोल येथे उपचारासाठी नेले असता मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: काटोल विधानसभेचे माजी आमदार तसेच म्हाडा सभापती मा.श्री.सुनील शामरावजी शिंदे (८६)यांचे आज सकाळी काटोल येथे उपचारासाठी नेले असता मृत्यू झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदजी पवार यांचे निकटवर्तीय होते.१९८४ ते १९९४ या काळात दहा वर्षे ते काटोल विधानसभेचे आमदार होते.म्हाडाचे सभापती पद सुद्धा त्यांनी भूषविले.शेतक?्याच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली व शेतक?्यांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.शेतक?्यांच्या संत्र्याला भाव मिळावा याकरिता अनेकदा रस्त्यावर व नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आंदोलने केली.
१९९० च्या काळात शिंदे शिक्षण संस्थेची स्थापना करून त्यांनी काटोल-नरखेड तालुक्यात शिक्षणाची क्रांती घडविली.शिक्षण क्षेत्राच्या क्रांतीमुळे मुला-मुलींचे जीवन घडले.तर अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. गेल्या अनेक वर्षे ग्राम पंचायत,सावरगाव येथे त्यांची सत्ता होती.अनेक विकासकामांची गंगा त्यांनी सावरगाव तसेच आमदार म्हणून काटोल विधानसभेत आणली.काटोल तालुक्यातील डोंगरगाव येथे एम.आई.डी. सी. आणून तिथे औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली.संत्रा कारखाना सुरू केला होता.अश्या या नेत्याचे आज निधन झाल्याने पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी,तीन मुले असा मोठा आप्त परिवार आहे.