राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 04:22 PM2020-12-19T16:22:21+5:302020-12-19T16:24:58+5:30
Ma. Go. Vaidya : मा. गो. वैद्य हे परखड मतांसाठी ओळखले जात होते. ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते. वैद्य यांचे आज दुपारी दुपारी 3.30 वाजता निधन झाले.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते.
मा. गो. वैद्य हे परखड मतांसाठी ओळखले जात होते. ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते. वैद्य यांचे आज दुपारी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते. यामुळे त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
RSS ideologue MG Vaidya (in file photo) passes away in Nagpur, Maharashtra. pic.twitter.com/fXa23ZR7GL
— ANI (@ANI) December 19, 2020
त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व मोठा आप्त परिवार आहे.
मा. गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवार, 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22 येथून निघेल. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.