नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू गुलाबराव कदम यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:20 AM2019-08-08T00:20:16+5:302019-08-08T00:21:21+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू गुलाबराव कदम यांचे (९२) निधन झाले. १९८१ ते १९८४ अशा तीन वर्षाच्या कालावधीमध्ये नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू गुलाबराव कदम यांचे (९२) निधन झाले. १९८१ ते १९८४ अशा तीन वर्षाच्या कालावधीमध्ये नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. उत्तम आणि शिस्तप्रिय प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती.
शिक्षण क्षेत्राची कारकीर्द त्यांनी वर्धा येथील यशवंत महाविद्यालयातून सुरू केली होती. त्यानंतर प्राचार्य पदावर असताना त्यांची नागपूर विद्याापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम सांभाळले. गुलाबराव कदम हे बहुजनांचे कैवारी आणि एका उत्तम प्रशासक होते. गुलाबराव कदम यांच्या पार्थिवावर गुरुवार ८ ऑगस्ट रोजी चोंडी, जिल्हा यवतमाळ येथे दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली.