गडचिरोली जिल्ह्यात खचत आहेत किल्ले
By admin | Published: October 21, 2014 12:55 AM2014-10-21T00:55:11+5:302014-10-21T00:55:11+5:30
आरमोरी भागात अनेक ऐतिहासिक मंदिर, गडकिल्ले आहेत. परंतु यांची देखभाल व्यवस्थित होत नसल्यामुळे ते आता पडण्याच्या अवस्थेत आले आहे. पुरातत्व खात्याकडून याची देखभाल व दुरूस्ती होणे
पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : आरमोरी, वैरागडचे प्राचीन वैभव
गडचिरोली : आरमोरी भागात अनेक ऐतिहासिक मंदिर, गडकिल्ले आहेत. परंतु यांची देखभाल व्यवस्थित होत नसल्यामुळे ते आता पडण्याच्या अवस्थेत आले आहे. पुरातत्व खात्याकडून याची देखभाल व दुरूस्ती होणे अपेक्षित आहे. परंतु या खात्याचे गडकिल्ले व मंदिराच्या संवर्धनासाठी प्रयत्न शून्य आहेत. तसेच या भागात स्वयंसेवी संघटनाही या कामी उदासिन आहेत.
वैरागडचा किल्ला नागवंशीय माना शासकांच्या राजवटीतील असल्याचे मानले जाते. हा किल्ला तालुक्यातील खोब्रागडी व वैलोचना नद्यांच्या संगमावर आहे. वैरागड गावाच्या नावावरूनच या किल्यास वैरागड किल्ला म्हणून ओळखले जाते. इ.स.१३ व्या शतकात काही काळ देवगीरीच्या यादवांनीसुद्धा हा किल्ला स्वत:च्या ताब्यात घेतला होता. यादवानंतर या किल्यावर गोंडाचे राज्य आले. यादवांच्या सैन्यातील एक गोंड अधिकारी कोलभिल्ल याने गोंड समाज बांधवांना संघटित करून स्वत: किल्ला ताब्यात घेऊन राज्य कारभार करू लागला. माना नरेश कुरूमश्रुहीद याने बांधलेला हा किल्ला बहामणीच्या कारकिर्दीत इ.स.१४७४ मध्ये बहामणी सेनापती युसूफ आदिलखानने स्वारी करून किल्ला बराच उद्ध्वस्त केला. त्यानंतर याच जागी गोंड नरेश बाबाजी बल्लाळशहाने (इ.स.१५७२ ते १५९७) नवीन किल्ला बांधल्याचा उल्लेख मिळतो. परंतु त्याच किल्याची नंतर डागडुजी करून बाबाजी बल्लाळशहा यांनी उभारलेला किल्ला हा सुमारे १० एकर जागेत उभा आहे. किल्याची तटबंदीची भिंत हा काळ्या बेसाल्ट पाषाणातील असून आज ती बऱ्याच ठिकाणी मोडकळीस आलेली आहे. किल्ल्याच्या सभोवताल खोल खंदक असून तटाची भिंत सुमारे १५ ते २० फूट उंचीची आहे. त्यावर आता बरेच झाडे वाढलेले आहेत. या किल्याचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणेस असून त्यास अन्य दोन प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वाराची स्थापत्यस्थिती फारशी चांगली नाही. त्यावर झाडे वाढलेली असून ते भग्नावस्थेत आहेत. आरमोरी येथील रामसागर तलावालागून असलेला शंभर वर्षापूर्वीचा हेमांडपंथीय किल्ला खचण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्याच्या दोनही बाजुला मोठ्या भेगा घेल्याने तो के व्हाही पडू शकतो, अशी त्याची अवस्था झाली आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये शिवमंदिर असून त्यात शिवाची मूर्ती आहे. आरमोरी शहरात हा एकमेव किल्ला आहे. परंतु त्याची डागडूजी झालेली नसल्याने तो शेवटच्या घटका मोजत आहे. (प्रतिनिधी)श