समृद्ध विदर्भ घडविण्याचा फॉर्च्युन फाऊं डेशनचा संकल्प

By admin | Published: January 7, 2015 12:58 AM2015-01-07T00:58:31+5:302015-01-07T00:58:31+5:30

बेरोजगार युवकांनी स्वत:च्या पायावर उभे करून उद्यमशील तरुणाई व समृद्ध विदर्भ घडविण्याचा संकल्प विदर्भ फॉर्च्युन फाऊं डेशनने केल्याची माहिती आमदार अनिल सोले यांनी मंगळवारी दिली.

Fortune Fountain's resolve to build a prosperous Vidarbha | समृद्ध विदर्भ घडविण्याचा फॉर्च्युन फाऊं डेशनचा संकल्प

समृद्ध विदर्भ घडविण्याचा फॉर्च्युन फाऊं डेशनचा संकल्प

Next

अनिल सोले यांची माहिती : यूथ एम्पॉवरमेंट समिटचे आयोजन
नागपूर : बेरोजगार युवकांनी स्वत:च्या पायावर उभे करून उद्यमशील तरुणाई व समृद्ध विदर्भ घडविण्याचा संकल्प विदर्भ फॉर्च्युन फाऊं डेशनने केल्याची माहिती आमदार अनिल सोले यांनी मंगळवारी दिली. शिक्षक सहकारी बँकेच्या गांधीसागर येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर आमदार विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, जि.प.चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, डॉ. उल्हास फडके, नितीन खर्चे व पंकज भोयर आदी उपस्थित होते.
सध्या बेरोजगारांचा प्रश्न गंभीर आहे. युुवकांच्या हाताला काम देणारी यंत्रणा कमी पडत आहे. विदर्भ विकासाच्या बाबतीत मागे पडत आहे. ही बाब विचारात घेता बेरोजगारांना काम व विदर्भ विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने विदर्भ फॉर्च्युन फाऊं डेशन आयोजित व नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशन , मिहान, नॅशनल रुरल व अर्बन लाईव्हलीहूड मिशन यांच्या विशेष सौजन्याने ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१४ दरम्यान कोराडी मार्गावरील मानकापूर स्पोर्टस् स्टेडियम येथे यूथ एम्पॉवरमेंट समिटचे आयोजन केल्याची माहिती त्यांनी दिली. यात देशभरातील तज्ज्ञाकडून एक हजाराहून अधिक स्वयंरोजगार व व्यवसायसंबधी विस्तृत माहिती दिली जाणार आहे. विदर्भातील कृषी, उद्योग, सेंद्रीय शेती, व्यवस्थापन, मार्केटिंग, स्पर्धा परीक्षा, कोणता अभ्यासक्रम घ्यावा, अशा विविध बाबींची माहिती दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वेंकय्या नायडू यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Fortune Fountain's resolve to build a prosperous Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.