भाजपाचा स्थापना दिवस : नागपुरातून ५,००० कार्यकर्ते जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 01:44 AM2018-04-04T01:44:50+5:302018-04-04T01:45:05+5:30
येत्या ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने मुंबई येथे साजरा केला जात आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजित पक्षाचा स्थापना दिवस व कार्यकर्ता मेळाव्यात राज्यभरातून पाच लाख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. नागपुरातूनही ५,००० च्यावर कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येत्या ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने मुंबई येथे साजरा केला जात आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजित पक्षाचा स्थापना दिवस व कार्यकर्ता मेळाव्यात राज्यभरातून पाच लाख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. नागपुरातूनही ५,००० च्यावर कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार असून, त्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
कार्यकर्ता मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. शहरातून २,५०० कार्यकर्ते खासगी वाहनाद्वारे मेळाव्यासाठी रवाना होणार आहेत. उर्वरित २,५०० च्यावर कार्यकर्त्यांसाठी अजनी स्थानकावरून विशेष रेल्वेगाडी बुक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोहळे यांच्यासह आमदार सुधाकर देशमुख, आमदार अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, महापौर नंदा जिचकार, मनपा सत्तापक्ष नेता संदीप जोशी, युवा मोर्चा राष्ट्रीय
उपाध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात युवा मोर्चाकडे विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, भाजपा शहर महामंत्री संदीप जाधव, सुनील मानेकर, जितेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.