शेतीपयाेगी साहित्य चाेरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:38+5:302020-12-11T04:27:38+5:30
पारशिवनी : शेतातील शेतीपयाेगी साहित्य चाेरून नेणाऱ्या सात चाेरट्यांपैकी पाच जणांना पारशिवनी पाेलिसांनी बुधवारी (दि. ९) रात्री विविध ठिकाणांहून ...
पारशिवनी : शेतातील शेतीपयाेगी साहित्य चाेरून नेणाऱ्या सात चाेरट्यांपैकी पाच जणांना पारशिवनी पाेलिसांनी बुधवारी (दि. ९) रात्री विविध ठिकाणांहून अटक केली. उर्वरित दाेघांचा शाेध सुरू असल्याचेही पाेलिसांनी स्पष्ट केले. या चाेरट्यांनी भागीमहारी शिवारातून शेतीपयाेगी साहित्य चाेरून नेले हाेते.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये किशाेर बावनकुळे (२७, रा. बाभूळवाडा, ता. पारशिवनी), श्रीकृष्ण तेजराम कुमरे (२५), राहुल सुरेश मडावी (२४), संथपाल गाेरखनाथ पंधरे (२६) तिघेही रा. उमरी, ता. पारशिवनी व दिनेश रामप्रसाद वरखडे (२७, रा. अंबाझरी) या पाच जणांचा समावेश असून, पसार चाेरट्यांची नावे कळू शकली नाही. अनिल सखराम राऊत, रा. भागीमहारी, ता. पारशिवनी यांची भागीमहारी शिवारात शेती आहे. या चाेरट्यांनी काही दिवसापूर्वी त्यांच्या शेतात ठेवलेले कल्टीव्हेटर व लाेखंडी साहित्य चाेरून नेले हाेते. त्यामुळे त्यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदविली हाेती. या साहित्याची किंमत ३० हजार रुपये असल्याचेही त्यांनी पाेलिसांना सांगितले हाेते.
या चाेरीत किशाेर बावनकुळेचा सहभाग असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्याला ताब्यात घेत चाैकशी केली. त्याचे गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यामुळे पाेलिसांनी इतरांनाही लगेच अटक केली. इतर दाेघांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले. त्यांना पारशिवनी येथील न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली असून, त्यांच्याकडून त्यांनी चाेरीसाठी वापरलेले ट्रॅक्टर व चाेरून नेलेले साहित्य जप्त केल्याची माहिती ठाणेदार संताेष वैरागडे यांनी दिली. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक संदीपान उबाळे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.