दुकान फाेडणारा चाेरटा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:46+5:302021-02-05T04:38:46+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : रेडिमेड कपड्याच्या दुकानात प्रवेश करून कपडे व राेख रक्कम चाेरून नेणाऱ्या चाेरट्यास काेराडी (ता. ...

Four arrested for shoplifting | दुकान फाेडणारा चाेरटा अटकेत

दुकान फाेडणारा चाेरटा अटकेत

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : रेडिमेड कपड्याच्या दुकानात प्रवेश करून कपडे व राेख रक्कम चाेरून नेणाऱ्या चाेरट्यास काेराडी (ता. कामठी) पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून त्याने चाेरून नेलेला सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलीस निरीक्षक राजेश पुकळे यांनी दिली.

विनाेद उर्फ विक्की उर्फ साेट्या वसंता हनवते (२०, रा. सिद्धार्थनगर, महादुला, ता. कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. महादुला येथील शिवाजी चाैकात असलेल्या शर्मा काॅम्प्लेक्समध्ये जितेंद्र वासुदेव बेलेकर यांचे ‘थीम ऑफ फॅशन’ नामक दुकान आहे. या दुकानात मंगळवारी (दि. २६) चाेरट्याने प्रवेश करीत सहा हजार रुपयांचे कपडे आणि एक हजार रुपये राेख असा एकूण सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला.

याप्रकरणी काेराडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. त्यातच विनाेदकडे नवीन कपडे असल्याची माहिती पाेलिसांना मिळाल्याने त्यांनी विनाेदला त्याच्या घरातून ताब्यात घेत चाैकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून त्याने चाेरून नेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत त्याला अटक केली. ही कारवाई जयंत गंगावणे, इस्रायल शरीफ, सुभाष दुपारे, कृष्णा रोकडे, किशोर ठाकरे, राहुल कुसराम, दिनेश महल्ले, स्नेहा मानकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Four arrested for shoplifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.