नागपुरात चार मोठ्या व्यापाऱ्यांनी काढले दिवाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:46 PM2018-09-06T23:46:47+5:302018-09-06T23:53:12+5:30
शहरातील चार मोठ्या व्यापाऱ्यांनी दिवाळे काढल्याने व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची देणी आहे. त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी कर्ज देणाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे. लोकमतकडे या सर्व व्यापाऱ्यांची नावे आहेत. परंतु सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल नसल्याने नाव प्रकाशित केले जात नही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील चार मोठ्या व्यापाऱ्यांनी दिवाळे काढल्याने व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची देणी आहे. त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी कर्ज देणाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे. लोकमतकडे या सर्व व्यापाऱ्यांची नावे आहेत. परंतु सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल नसल्याने नाव प्रकाशित केले जात नही.
या व्यापाऱ्यांपैकी एकजण मोठ्या राजकीय पक्षाशी जुळलेला आहे. तो या पक्षाच्या एका आघाडीचा मोठा नेताही आहे. कळमना बाजारातील सूत्रानुसार या व्यापाऱ्यावर तब्बल ३५ कोटी रुपयाचे देणे आहे. १५ कोटी रुपयाची देणी उघडकीस आली आहे. यात सव्वादोन कोटी रुपये बँकेचे कर्ज आहे. यासोबतच त्याच्यावर दोन दलाल आणि काही व्यापाºयांसह नातेवाईकांचीही देणी आहेत. आता त्याचे म्हणणे आहे की, कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. काही संपत्ती आहे. हा व्यापारी संपत्ती देऊन हिशेब चुकता करू इच्छित आहे. परंतु त्याने संपत्तीची जी किंमत मोजली आहे, ती बाजारभावापेक्षा कितीतरी अधिक आहे. अशा परिस्थितीत व्यापारी त्याच्या घराच्या चकरा मारत आहेत. यादरम्यान एका कर्जदात्याने पैसे वसुलण्यासाठी त्याचे कळमना बाजार येथील दुकान पैसे न देताच खरेदी केले आहे.
या व्यापाऱ्याचा मोठा दबदबा राहिलेला आहे. राजकीय पक्षाशिवाय समाजाशी संबंधित संघटनेचा अध्यक्षही आहे. कळमना बाजाराच्या राजकारणाशीही तो जुळलेला आहे. गेल्या महापलिकेच्या निवडणुकीत एका उमेदवाराचा तो अतिशय खास होता. तो उमेदवार आता त्याची मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
या व्यापाऱ्याशिवाय शहरातील इतर तीन मोठ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा दिवाळे काढले आहे. सर्वात अगोदर रामदासपेठ येथील लोखंडाच्या एका मोठ्या व्यापाऱ्याने दिवाळे घोषित केले आहे. त्याच्यावर जवळपास २०० कोटी रुपयाची देणी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने नोटबंदीदरम्यान मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम एक्सेंजच्या नावावर जमा केली होती. याशिवाय शहरातील एक मोठा आॅटोमोबाईल व्यापारीही संकटात आहे. एक हॉटेल व्यावसायिकाचेही वाईट दिवस आहे. दोघांवरही लोकांची मोठी देणी आहे. त्यांनी मूळ रक्कम सुविधेनुसार परत करण्याचे आश्वासन देत व्याजातून मुक्त करण्यास सांगितले आहे.
कपडे आणि जोडे
राजकीय पक्षाशी जुळलेल्या व्यापाऱ्याचा मुख्य व्यवसाय धान्य आणि मसाल्याशी संबंधित आहे. परंतु अलीकडे तो कपड्यांच्या व्यवसायाशीही जुळलेला आहे. भंडारा रोडवर त्याने एक बुटीक उघडल्यानंतर जरीपटक्यातही दुकान उघडले आहे. कपड्यांचा व्यवसाय तो आपली मुलं आणि भावांच्या नावावर करीत आहे. सूत्रांनुसार या व्यापाऱ्याने अलीकडेच चीनवरून १ कोटी २० लाखाचे जोडे आणि वॉलपेपर सुद्धा आणले. या व्यापऱ्याच्या जवळच्या नातेवाईकाने अलीकडे आयात-निर्यातीचा व्यापारही सुरू केला आहे. या व्यवसायात ही रक्कम लावण्याची शंका व्यक्त केली जात आहे.