नेतागिरी करणा-या महिलेकडून चोरीचे चार गुन्हे उघड
By admin | Published: February 28, 2017 09:42 PM2017-02-28T21:42:27+5:302017-02-28T21:42:27+5:30
राजकीय पक्षाची शाल घेऊन नेतागिरी करीत फिरतानाच विविध कार्यक्रमात चोरी करणा-या विमल संगीतबाबू इंगळे (वय ५०, रा. अजनी) नामक महिलेकडून सीताबर्डी
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 - राजकीय पक्षाची शाल घेऊन नेतागिरी करीत फिरतानाच विविध कार्यक्रमात चोरी करणा-या विमल संगीतबाबू इंगळे (वय ५०, रा. अजनी) नामक महिलेकडून सीताबर्डी पोलिसांनी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहे. या गुन्ह्यात तिने चोरलेल्या पर्स, विदेशी चलन, मोबाईल, साड्या, घड्याळांसह मोठा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
१२ जुलैला कुसुमताई वानखेडे सभागृहातील लग्नसमारंभात शिरलेल्या विमल इंगळे हिने दीपाली संदीप राऊत (प्रतापनगर) यांची ४५ हजारांची रोकड आणि मोबाईल ठेवलेली पसर चोरली होती. राऊत यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी केली आणि विमल तसेच तिचा मुलगा (अजनीतील तडीपार गुंड) करण संगीतबाबू इंगळे (वय २०) या दोघांना अटक केली. चौकशीत विमल हिने हा गुन्हा करण्यापुर्वी बजाजनगरातील सन्मान लॉन, सक्करद-यातील महात्मा फुले सभागृह, फेब्रुवारी २०१५ मध्ये वानखेडे सभागृहातत अशाच प्रकारे चोरी केल्याचे उघड झाले. तिने या गुन्ह्यांची कबुली देतानाच वेगवेगळळ्या ठिकाणांहून चोरलेल्या पर्स, त्यातील विदेशी चलन, मोबाईल, महिलांची सौंदर्यप्रसाधने, घड्याळं, कॅमेरा, साड्या,ब्लाऊजही पोलिसांना काढून दिले. रोख रक्कम मात्र तिने खर्च केली.
अनेक वर्षांपासून सक्रीय
विविध राजकीय, तसेच सामाजिक कार्यक्रमात जाऊन नेतागिरी करणा-या आणि प्रसंगी अनेक प्रकरणात पोलीस ठाण्यात जाऊन हस्तक्षेप करणा-या विमल इंगळेची दुहेरी भूमीका अनेक वर्षांपासून सुरू होती. तिने केलेल्या चो-यांपैकी अनेक ठिकाणची तक्रारच दाखल न झाल्यामुळे तिच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मालाबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. लग्न समारंभ किंवा अशाच कुण्या कार्यक्रमात पर्स चोरीला गेली असेल, त्यांनी सीताबर्डी ठाण्यात संपर्क केल्यास पुन्हा काही गुन्हे उजेडात येऊ शकतात.