मिहानमध्ये चार कंपन्या लवकरच बांधकाम पूर्ण करणार - एमएडीसीतर्फे नवीन रस्त्याचे बांधकाम

By मोरेश्वर मानापुरे | Published: January 11, 2024 10:02 PM2024-01-11T22:02:34+5:302024-01-11T22:03:32+5:30

‘गेल’चे मध्यवर्ती कार्यालय १७ एकरात बांधले जाणार

Four companies will soon complete construction in Mihan - Construction of new road by MADC | मिहानमध्ये चार कंपन्या लवकरच बांधकाम पूर्ण करणार - एमएडीसीतर्फे नवीन रस्त्याचे बांधकाम

मिहानमध्ये चार कंपन्या लवकरच बांधकाम पूर्ण करणार - एमएडीसीतर्फे नवीन रस्त्याचे बांधकाम

नागपूर: मिहानच्या सेक्टर २१ मध्ये दोन आयटी आणि दोन खाद्यान्न प्रक्रिया कंपन्यांचे बांधकाम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी दिली. याकरिता एमएडीसी नवीन रस्ता तयार करत आहे. याशिवाय हिंगणाला जोडण्यासाठी पतंजली बाजूकडून चौपदरी रस्ता आणि अंतर्गत रस्त्याचे कामही सुरू होणार आहे.

मिहान कॅम्पसमधील मध्यवर्ती सुविधा इमारतीतील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत पांडे यांनी मिहान विकासाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ३.५ एमएलडीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधण्यात येणार आहे. मिहानमधील या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे कंपन्यांसाठी सुविधा वाढेल. मिहान-सेझमध्ये लवकरच नवीन फार्मा कंपन्या येणार आहेत. शिर्डी आणि अमरावती विमानतळाच्या विकासाचे काम सुरू असून लवकरच पूर्ण होईल. गडचिरोलीतील विमानतळासाठी जमिनीचा विचार सुरू आहे.

‘गेल’चे मध्यवर्ती कार्यालय १७ एकरात बांधले जाणार
गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) मिहानच्या बिगर एसईझेड क्षेत्रातील सेक्टर १२-ए मध्ये त्यांचे केंद्रीय कार्यालय स्थापन करणार आहे. गेलचे डेटा सेंटर आणि मॉनिटरिंग सेंटर राहील. सार्वजनिक क्षेत्रातील या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. गेलला जमीन देण्याची आणि करारावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पतंजलीचा ज्यूस प्रकल्पाचे संचालन एप्रिलपासून होईल. मिहानमध्ये आतापर्यंत १ लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. रोजगाराची आकडेवारी आणखी वाढेल.

 

 

 

Web Title: Four companies will soon complete construction in Mihan - Construction of new road by MADC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर