साडेचार कोटींची सुपारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:50 AM2017-09-08T01:50:13+5:302017-09-08T01:51:32+5:30
अन्न व औषध विभागाच्या अधिकाºयांनी १४ व्यापाºयांच्या प्रतिष्ठानांवर धाडी टाकून ४ कोटी ५२ लाख ४५ हजार ५८० रुपये किमतीची २ लाख ५० हजार २०१ किलो सुपारी जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न व औषध विभागाच्या अधिकाºयांनी १४ व्यापाºयांच्या प्रतिष्ठानांवर धाडी टाकून ४ कोटी ५२ लाख ४५ हजार ५८० रुपये किमतीची २ लाख ५० हजार २०१ किलो सुपारी जप्त केली. सुपारी निकृष्ट असल्याच्या संशयावरून विभागाने दोन दिवस कारवाई केली.
विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी आणि नागपूर विभागातील अन्न सुरक्षा अधिकाºयांच्या मदतीने नागपूर शहर व जिल्ह्यातील विविध सुपारी प्रक्रिया करणारे व्यावसायिक, त्यांची गोदामे आणि शितगृहात विक्रीसाठी साठविलेल्या सुपारीवर ५ व ६ सप्टेंबरला एकत्रित कारवाई करण्यात आली. विभागाने ५ सप्टेंबरला १० व्यापाºयांवर धाडी टाकल्या. त्यात महादेवनगर, सुराबर्डी येथील श्री विद्यासागर रोडवेजच्या गोदाम-२३ येथून २.५५ कोटी रुपये किमतीची १ लाख ४९ हजार किलो सुपारी, कळमना येथील दिया गृह उद्योगातून ३.७१ लाख रुपयांची १७७६ किलो सुपारी, चिखली ले-आऊट, कळमना येथील जयस्वाल ट्रेडिंग कंपनीतून १५.५९ लाख रुपयांची ५९९८ किलो सुपारी, ट्रान्सपोर्टनगर, भंडारा रोड येथील भोपाळ इंदोर रोड लाईन्स येथून ३२.३९ लाख रुपये किमतीची १९,९९८ किलो सुपारी, मस्कासाथ इतवारी येथील रॉयल मार्केटिंगमधून ५२.६३ लाख रुपये किमतीची २६,९९४ किलो सुपारी, तेलीपुरा येथील पीपीपी इंटरप्राईजेस येथून १.३८ लाख रुपयांची ६५८ किलो सुपारी, मस्कासाथ येथील त्रिमूर्ती ट्रेडर्समधून ६.१० लाख रुपये किमतीची ३,०५३ किलो सुपारी, नेहरू पुतळा, तेलीपुरा येथील पी.एम. कंपनीमधून ८.२८ लाख रुपये किमतीची ३,८९८ किलो सुपारी, चांद मोहल्ला, मस्कासाथ, इतवारी येथील एस.टी. ट्रेडर्स येथून ८.१५ लाख रुपये किमतीची ३,१९८ किलो सुपारी आणि चिखली ले-आऊट येथील नंदी गृह उद्योगमधून ४.३९ लाखांची २३७८ किलो सुपारी जप्त केली. याशिवाय ६ सप्टेंबरला टाकलेल्या धाडीत चिराग कोल्ड स्टोरेज वाठोडा, नंदी गृह उद्योग, चिखली ले-आऊट, एम.टी. ट्रेडर्स मस्कासाथ, इतवारी आणि रॉयल मार्केटिंग, रसिक कॉम्प्लेक्स, मस्कासाथ, इतवारी येथील एकूण चार पेढ्यांनी विक्रीसाठी साठविलेली ६५.१८ लाख रुपये किमतीची ३२,५७० किलो सुपारी जप्त केली.
६१ हजारांचे खाद्य तेल जप्त
सणासुदीचे दिवस लक्षात घेता नेहरू पुतळा मस्कासाथ, इतवारी येथील प्रभू ट्रेडिंग कंपनी या खाद्यतेल विक्रेत्यावर धाड टाकून ६१ हजार ४८८ रुपयांचे ८३८ किलो रिफाईन सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) मिलिंद देशपांडे आणि शरद कोलते यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) अभय देशपांडे, मनोज तिवारी, विनोद धवड, प्रफुल टोपले, अमितकुमार उपलप, सीमा सुरकर, अखिलेश राऊत, आनंद महाजन, भास्कर नंदनवार, ललित सोयाम, अनंत चौधरी व प्रवीण उमप यांनी केली. जनआरोग्याच्या दृष्टीने याप्रकारची धडक मोहीम सुरू राहणार असल्याचे केकरे म्हणाले.