चार दिवस अनुयायींसाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 01:34 AM2017-09-30T01:34:38+5:302017-09-30T01:34:49+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे १५०० सैनिक दीक्षाभूमीवर शुक्रवारपासून सज्ज झाले आहेत. दिल्ली ते राजस्थान येथून हे सैनिक आले आहेत.

For four days followers ... | चार दिवस अनुयायींसाठी...

चार दिवस अनुयायींसाठी...

googlenewsNext
ठळक मुद्देसमता सैनिक दलाची सेवा सुरक्षा : देशाच्या कानाकोपºयातील सैनिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे १५०० सैनिक दीक्षाभूमीवर शुक्रवारपासून सज्ज झाले आहेत. दिल्ली ते राजस्थान येथून हे सैनिक आले आहेत. दीक्षाभूमीवरील प्रत्येक आंबेडकरी अनुयायी सुरक्षित राहावा, त्याची गैरसोय होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून सलग चार दिवस हे सैनिक नि:स्वार्थपणे सुरक्षा व सेवा देण्यासाठी तैनात झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ रोजी महाडला एक परिषद भरविली होती. या परिषदेत त्यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. समता सैनिक दलाच्या उपस्थितीमुळे आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यक्रम सुखरूपपणे पार पडले. चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह, १९५६ सालचा बाबासाहेबांचा नागपुरातील धर्मांतरण सोहळा असो किंवा नामांतराचा लढा , १९८७ मधील दंगल असो की घाटकोपर दंगल प्रत्येकवेळी समता सैनिक दलाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली. निळी टोपी, पांढरा शर्ट, खॉकी पॅण्ट आणि हातात काठी हा गणेवशधारी सैनिक दरवर्षी दीक्षाभूमीवरही आपली सेवा देत आहे.
६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने शुक्रवारपासून या सैनिकांनी आपली जागा घेऊन सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत.
देशाच्या कानाकोपºयातून येतात सैनिक
समता सैनिक दलाचे राष्टÑीय जीओसी प्रदीप डोंगरे म्हणाले, भदन्त नागदीपंकर थेरो यांच्या मार्गदर्शनात समता सैनिक दलाचे राष्टÑीय अध्यक्ष डी. कोेचे, एम. आर. राऊत यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर होणाºया ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात आपली सेवा व सुरक्षा व्यवस्था बजावण्यासाठी देशातून दीड हजार सैनिक आले आहेत. यात महाराष्टÑसह दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तामिळनाडू येथून हे सैनिक आले आहेत.
सुरक्षेसोबतच सेवाही
डोंगरे यांनी सांगितले, दीक्षाभूमीवर सलग चार दिवस समता सैनिक दलाचे सैनिक सुरक्षेबरोबरच असामाजिक तत्त्वांवर नियंत्रण, शिस्तीत लोकांना स्तूपापर्यंत घेऊन जाण्याचे काम, लोकांना सहकार्य, गर्दी निवळण्याचे काम, आजारींना हेल्थ कॅम्पपर्यंत घेऊन जाण्याचे काम, हरविलेल्यांना सहयोग स्थळी घेऊन जाण्याचे कामही हे सैनिक करतात. प्रमिला संघर्षसूत सिद्धार्थ, प्रा. संजय घोडके, प्रा. गजेंद्र गजभिये, संघप्रिय नाग, सी.टी.मेश्राम, अमरदीपंकर, पृथ्वी एन. मोटघर यांचे विशेष सहकार्य असते.

Web Title: For four days followers ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.