मुंबईहून नागपुरात येणाऱ्या चार विमानांना उशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 23:41 IST2018-07-10T23:39:59+5:302018-07-10T23:41:24+5:30
सायंकाळी मुंबईहून नागपुरात येणारी इंडिगो, गो-एअर, एअर इंडिया आणि जेट एअरवेज (इंडिया) या चार कंपन्यांची विमाने मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात उशिरा पोहोचली. त्यामुळे नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

मुंबईहून नागपुरात येणाऱ्या चार विमानांना उशीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायंकाळी मुंबईहून नागपुरात येणारी इंडिगो, गो-एअर, एअर इंडिया आणि जेट एअरवेज (इंडिया) या चार कंपन्यांची विमाने मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपुरात उशिरा पोहोचली. त्यामुळे नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाने जारी केलेल्या चार्टनुसार इंडिगोचे मुंबईहून नागपुरात सायंकाळी ५.३० वाजता येणारे विमान तब्बल २ तास ३ मिनिटे उशिराने पोहोचले. तर गो-एअरचे विमान रात्री ९.११ वाजता अर्थात ५६ मिनिटे उशिरा, एअर इंडियाचे रात्री ११.१८ वाजता अर्थात तब्बल २ तास ४३ मिनिटे उशिरा आणि जेट एअरवेजचे (इंडिया) विमान निर्धारित वेळेपेक्षा नागपुरात १ तास ४० मिनिटे उशिरा आले. त्यामुळे नागपुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले.