दीक्षाभूमी परिसरात चार फूड झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:25 AM2017-09-26T00:25:51+5:302017-09-26T00:26:35+5:30

दीक्षाभूमी येथे आयोजित ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी संपूर्ण भारतातून येणाºया लाखो बौद्ध अनुयायांना पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा,.....

Four food zones in Dikshitbhoomi area | दीक्षाभूमी परिसरात चार फूड झोन

दीक्षाभूमी परिसरात चार फूड झोन

Next
ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व्यवस्थेचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीक्षाभूमी येथे आयोजित ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी संपूर्ण भारतातून येणाºया लाखो बौद्ध अनुयायांना पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, तसेच संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देऊन धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा होईल. या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच दीक्षाभूमी परिसरातील चारही बाजूंनी विशेष फूड झोन तयार करावे, त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच अन्नाची नासाडी होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्न व औषध प्रशासनाने अन्नाची तपासणी करावी, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या.
दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानिमित्त आयोजनाच्या तयारीचा आढावा पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला, त्यावेळी अधिकाºयांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, माजी मंत्री नितीन राऊत, स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुधीर फुलझेले, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, प्रवीणसिंह परदेशी, स्मार्तना पाटील, महानगरपालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे आदी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दीक्षाभूमी येथे दिनांक २८ ते ३१ सप्टेंबरपर्यंत महानगर पालिकेने अस्थायी शौचालय, स्नानगृह, पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरते नळ, चौवीस तास स्वच्छता, संपूर्ण परिसरात विजेची व्यवस्था, अंबाझरी घाट येथे लाईफगार्ड नियुक्त करावे, तसेच येथे पुरेशी विद्युत व्यवस्था करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध विभागांकडे जबाबदाºया सोपविल्या असून त्यानुसार विभाग प्रमुखांनी दिलेली कामे तात्काळ पूर्ण करावी, संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यावर विशेष व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या विविध सोईसुविधांबाबत यावेळी माहिती दिली.
नियंत्रण कक्ष
दीक्षाभूमी परिसरात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत असून, या नियंत्रण कक्षात सर्व विभागाचे अधिकारी यांची नियुक्त करण्यात येत आहे. या नियंत्रण कक्षात नियुक्त केलेल्या अधिकाºयांचे दूरध्वनी क्रमांक व नावे कळवावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. पावसाचा व्यत्यय आल्यास अनुयायांसाठी सभोवतालच्या शाळा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार व्यवस्था करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
२२० नळ, १० टँकर
महानगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्यासाठी २२० अस्थायी नळ, १० टँकर, तात्पुरते शौचालय तसेच मोबाईल शौचालय, स्नानगृह, २३५ फ्लड लाईट तसेच तीन पाळ्यांमध्ये स्वच्छता कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आल्याचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी सांगितले.
दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस ३५० बसफेºया
दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेससाठी ३५० बस फेºया करण्यात येणार आहेत. तसेच मोरभवन व इतर ठिकाणावरून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या भागात बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात राहतात तेथून दीक्षाभूमीसाठी विशेष बसव्यवस्था करावी, असेही बैठकीत ठरले.
माता कचेरी येथे सुसज्ज वैद्यकीय व्यवस्था
दीक्षाभूमीवर येणाºया बौद्ध-आंबेडकरी अनुयायांना आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सुविधा उपलब्ध केली जाते. आरोग्य विभागातर्फे यंदाही माताकचेरी येथे सुसज्ज वैद्यकीय व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.
१२०० पोलीस तैनात
सुरक्षेच्या दृष्टीने दीक्षाभूमी परिसरात १२०० पोलीस तैनात राहणार असून २४ तास या संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून वाहतूक व्यवस्था, बाहेरून येणाºया बसेस व जीप थांबण्यासाठी पार्किंग झोन तयार करावे तसेच दीक्षाभूमी परिसर व दीक्षाभूमीच्या बाहेरील संपूर्ण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

Web Title: Four food zones in Dikshitbhoomi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.