चार लाखांची केबल चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:08 AM2021-02-25T04:08:41+5:302021-02-25T04:08:41+5:30
---------- गॅसच्या भडक्याने वृद्धेचा मृत्यू नागपूर : स्वयंपाक करताना गॅसच्या भडक्याने गंभीर जळालेल्या ८२ वर्षीय वृद्धेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ...
----------
गॅसच्या भडक्याने वृद्धेचा मृत्यू
नागपूर : स्वयंपाक करताना गॅसच्या भडक्याने गंभीर जळालेल्या ८२ वर्षीय वृद्धेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. विजया वामन इंगळे असे मृत महिलेचे नाव आबे. इंगळे या बोरकुटे-लेआऊट नरेंद्रनगर येथे राहत होत्या. गेल्या १० तारखेला सकाळी ८.३० वाजता गॅसवर स्वयंपाक करीत असताना अचानक भडका उडाला. यात त्या गंभीर जळाल्या. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
------------
चौकीदाराची गळफास घेऊन आत्महत्या
नागपूर : प्रतापनगर पोलीस हद्दीत जरेकर प्लॉट नं. ६ पोस्टल ऑडिट कॉलनी येथील तरुण चौकीदाराने गळफास लावून आत्महत्या केली. अजित शशी सोनेश्वर (वय २०, रा. बालाघाट मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रतापनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.