आगींमुळे पावणेचार लाख हेक्टर वनक्षेत्र राज्यात खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 05:46 AM2020-03-02T05:46:28+5:302020-03-02T05:47:07+5:30
२००९ पासून राज्यभरातील वनक्षेत्रामध्ये आग लागल्याच्या ४७ हजारांहून अधिक घटना नोंदविल्या गेल्या असून त्यात तब्बल पावणेचार लाख हेक्टरहून अधिक वनक्षेत्र जळून खाक झाले आहे.
नागपूर : २००९ पासून राज्यभरातील वनक्षेत्रामध्ये आग लागल्याच्या ४७ हजारांहून अधिक घटना नोंदविल्या गेल्या असून त्यात तब्बल पावणेचार लाख हेक्टरहून अधिक वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. तर साडेतीन कोटींहून अधिक नुकसान झाले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महाराष्ट्र मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली होती. २००९ पासून वनक्षेत्रांमध्ये किती आगी लागल्या, किती क्षेत्र जळून खाक झाले, यात किती नुकसान झाले आदी प्रश्न त्यांनी विचारले होते.
>२०१८ : ८ हजार घटना
२०१८ मध्ये आगीच्या सर्वाधिक ८ हजार ४६४ घटनांची नोंद झाली. त्यात ४५ हजार २८९ हेक्टर वनक्षेत्र जळाले. २०१२ मध्ये आगीच्या घटनांची संख्या ४ हजार ७४३ होती. परंतु यात तब्बल ७१ हजार ४८१ हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले होते. २०१५ मध्ये सर्वात कमी १ हजार ८७९ आगीच्या घटना घडल्या. त्यात ११ हजार ७५ हेक्टर क्षेत्र जळाले.