नागपुरात आधार लिंकच्या नावावर चार लाखाने फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:05 AM2018-04-12T10:05:15+5:302018-04-12T10:05:24+5:30
आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीच्या मोबाईलवर डेबिट कार्डचा नंबर मागून परस्पर चार लाख रुपये काढून फसवणूक करण्यात आली. मंगळवारी नंदनवन येथे ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीच्या मोबाईलवर डेबिट कार्डचा नंबर मागून परस्पर चार लाख रुपये काढून फसवणूक करण्यात आली. मंगळवारी नंदनवन येथे ही घटना घडली.
मंगळवारी दुपारी २.३० वाजता नंदनवन येथील खंडवानी अपार्टमेंटमधील रहिवासी कमलेश कुमार सिंह राजकुमार सिंह (५५) यांच्या मोबाईलवर अनोळखी युवकाचा फोन आला. त्याने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी डेबिट कार्डची माहिती मागितली. कमलेश कुमारने पूर्ण माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून आरोपीने चार लाख आठ हजार रुपये काढून टाकले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.