महाजेनकोची सात पैकी चार विद्युत केंद्रे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 09:16 PM2020-04-10T21:16:41+5:302020-04-10T21:18:10+5:30
कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी करण्यता आलेल्या लॉकडाऊनचा कहर विज उत्पादन क्षेत्रावर पडलेला दिसून येतो. उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठो बंद असल्याच्या कारणाने विजेची मागणी घसरत १५ हजार मेगाव्हॅटपर्यंत उतरली आहे. त्यामुळे महाजेनकोचे सातपैकी चार विद्युत केंद्रे बंद पडलेली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी करण्यता आलेल्या लॉकडाऊनचा कहर विज उत्पादन क्षेत्रावर पडलेला दिसून येतो. उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठो बंद असल्याच्या कारणाने विजेची मागणी घसरत १५ हजार मेगाव्हॅटपर्यंत उतरली आहे. त्यामुळे महाजेनकोचे सातपैकी चार विद्युत केंद्रे बंद पडलेली आहेत.
जिल्ह्यातील खापरखेडा वीज केंद्रासह नाशिक, परळी व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील वीज उत्पादन थांबवण्यात आले आहे. कोरोडी औष्णिक विद्युत केंद्र सर्वाधिक ११७४ मेगाव्हॅटचे उत्पादन करत आहे तर पारस ४३५ मेगाव्हॅट आणि चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र विजेचे उत्पदन करत आहे. कोयना सह हायड्रो प्रोजेक्ट ६७४ आणि गॅस आधारित उरण प्रकल्पातून २७४ मेगाव्हॅट विजेचे उत्पादन होत आहे. अशा स्थितीत महाजेनकोचे एकूण उत्पादन ३७१९ मेगाव्हॅटपर्यंत घसरले आहे. जेव्हाकी या केंद्रांची उत्पादन क्षमता १३,६०२ मेगाव्हॅट इतकी आहे. मुंबईसह इतर प्रदेशातील विजेची एकूण मागणी १५ हजार मेगाव्हॅटच्या जवळपास आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता विजेची एकूण मागणी १४,८१३ मेगाव्हॅट इतकी होती. अशा स्थितीत महावितरणने खाजगी क्षेत्राकडून ४४७९ व सेंट्रल एक्सचेंजकडून मिळालेल्या ५२१३ मेगाव्हॅटच्या आधारावर विजेची मागणी पूर्ण केली. विशेष म्हणजे मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्यात विजेच्या मागणीचे सत्र वाढत असते आणि एप्रिलच्या मध्यापर्यंत ही मागणी २३ हजार मेगाव्हॅटपर्यंत पोहोचत असते. परंतु, लॉकडाऊनमुळे केवळ घरेलू आणि कृषी क्षेत्रातूनच विजेची मागणी वाढल्याने राज्यात विज अनुकुलता पुरेसी म्हटली जात आहे. अशा स्थितीत महाग उत्पादन लागत असलेले विद्युत युनिट बंद करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी लाईट्स बंद करून नागरिकांनी दिवे लावले होते. त्याही दिवशी हीच चार केंद्रे सुरू होती. तेव्हापासून आधीच बंद करण्यात आलेली केंद्र आताही बंद ठेवण्यात आली आहेत.