चार लाख लोकांनी अजूनही पहिला डोस घेतला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:10 AM2021-08-27T04:10:49+5:302021-08-27T04:10:49+5:30
मनपा आयुक्तांचे लसीकरणासाठी आवाहन : धोका कायम असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाचा ...
मनपा आयुक्तांचे लसीकरणासाठी आवाहन : धोका कायम असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाचा धोका अजूनही टळलेला नाही. असे असूनही शहरातील १८ वर्षांवरील ३ ते ४ लाख लोकांनी अजूनही लसीचा पहिला डोस घेतलेला नाही.
१८ वर्षांवरील ११ लाख ४३ हजार ४६३ नागरिकांनी पहिला तर ४ लाख ७८ हजार २६२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ वर्षांवरील नागपूर शहरातील नागरिकांची लोकसंख्या विचारात घेता अजूनही ३ ते ४ नागरिकांनी लसीकरण केलेले नाही. त्यांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेची भीती अजूनही कायम आहे. तासांची आकडेवारी भीतीदायक आहे. केरळमध्ये एकाच दिवसात कोरोनाची २४ हजार नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, याचा विचार करता नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. संक्रमणापासून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
.....जोड आहे.....