नागपुरात विविध ठिकाणच्या अपघातात चार जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:05 PM2018-01-01T23:05:31+5:302018-01-01T23:09:31+5:30

उपराजधानीतील विविध भागात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. यात एका ट्रकच्या वाहकाचाही समावेश आहे. यशोधरानगर, जुनी कामठी, अजनी आणि जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले.

Four people were killed in various road accidents in Nagpur | नागपुरात विविध ठिकाणच्या अपघातात चार जण ठार

नागपुरात विविध ठिकाणच्या अपघातात चार जण ठार

Next
ठळक मुद्देवाहनचालकांचा निष्काळजीपणायशोधरानगर, अजनी, जुनी कामठी आणि जरीपटक्यात गुन्हे

आॅनलाईन लोकमत
नागपूर : उपराजधानीतील विविध भागात झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. यात एका ट्रकच्या वाहकाचाही समावेश आहे. यशोधरानगर, जुनी कामठी, अजनी आणि जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले.
निष्काळजीपणे ट्रक मागे घेऊन चालकाने ट्रकच्या वाहकाला चिरडले. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी ११.४५ वाजता हा भीषण अपघात घडला.
आरोपी शहजाद शाह शाहिद शाह (रा. डोबीनगर) हा टिपू सुलतान चौकाजवळच्या गोदामात रविवारी दुपारी भंगार खाली करण्यासाठी ट्रक मागे घेत होता.
ट्रकवर काम करणारा हबीब नामक इसम चालकाला मागची स्थिती सांगत होता. हबीबकडे दुर्लक्ष करून आरोपी शहजादने वेगात ट्रक मागे घेतला. त्यामुळे ट्रक आणि भिंतीच्या मध्ये हबीब चिरडला गेला. याप्रकरणी मोहम्मद रियाज अब्दुल लतीफ (वय २८) यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपी ट्रकचालक शहजाद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जुनी कामठी
प्रबुद्धनगर कामठी येथील रहिवासी नसीम अब्दुल जब्बार (वय ३९) रविवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास कुंभारे कॉम्प्लेक्ससमोरून रस्ता ओलांडत होते. त्यांना एका भरधाव आॅटोचालकाने धडक मारली. त्यामुळे ते खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नल्लीम नसीम अख्तर (वय १८) यांच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी आॅटोचालकाचा शोध घेतला जात आहे.
अजनी
अजनीतील रेल्वे वसाहतीत ४०१ क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे संजय वसंतराव तालुरकर (वय ५४) यांना रविवारी रात्री १०.२६ वाजता अपघात झाला. तालुरकर त्यांच्या मोटरसायकलवरून खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तेथे रात्री ११.३० च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिळालेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी अपघाताची नोंद केली.
जरीपटका
नारीतील रहिवासी विशाल सिद्धार्थ पाटील (वय २६) या तरुणाच्या डिओ दुचाकीला कामठी मार्गावरील विदर्भ डिस्ट्रीलर कंपनीसमोर सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास एका भरधाव वाहनाने जोरदार धडक मारली. त्यामुळे विशाल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी सोमवारी सकाळी ८.४५ वाजता मृत घोषित केले. सुधाकर पुंडलिक गणेर (वय ४२) यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपघाताची नोंद केली. आरोपी वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Four people were killed in various road accidents in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.