चाकूने वार करून महिलेसह चौघांना केले गंभीर जखमी, अंगावर कार घालण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:54 AM2023-06-27T10:54:42+5:302023-06-27T10:55:45+5:30

चार महिन्यांपूर्वी आरोपीने महिलेच्या मुलीचे केले होते अपहरण

Four persons, including a woman, were seriously injured in a knife attack in Nagpur | चाकूने वार करून महिलेसह चौघांना केले गंभीर जखमी, अंगावर कार घालण्याचा प्रयत्न

चाकूने वार करून महिलेसह चौघांना केले गंभीर जखमी, अंगावर कार घालण्याचा प्रयत्न

googlenewsNext

नागपूर : अंगावर कार चालवून जीव घेतो काय, असे म्हटल्यामुळे आरोपीने महिला, तिचा मुलगा, दीर आणि डेकोरेशनचे काम करणाऱ्या व्यक्तीला आरोपीने चाकूने वार करून जखमी केले. ही घटना पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास घडली आहे. पारडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

रमजान उर्फ मुनीर इकराम अंसारी (वय १९, रा. सबीना ले आऊट, आजरीमाजरी, यशोधरानगर) असे हल्ला केलेल्या आरोपीचे नाव आहे. बिस्मिल्ला रफीक कनोज (वय ३७, रा. नवीननगर, प्रायमरी शाळेजवळ पारडी) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. बिस्मिल्ला या आपले दीर इकबाल शेख अजीज शेख (वय ४०, रा. हसनबाग कब्रस्तानजवळ, नंदनवन), डेकोरेशनचे काम करणारे राजू शंकर धमगाये (वय ३९, रा. बिसमिल्ला यांच्या घरी) आणि दिनेश लालदास बांते (रा. नवीननगर पारडी) यांच्यासोबत बाराद्वारी पारडी येथून श्यामनगरकडे दुचाकीने जात होत्या.

स्मार्ट सिटी रोडवर लाल रंगाची कार क्रमांक एम. एच. ३१, ए. जी-८११० च्या चालकाने कार भरधाव चालवून त्यांना कट मारला. यात त्यांनी आपली दुचाकी बाजूला घेऊन ‘हमारे उपर कार चला रहा क्या’, अशी विचारणा केली. त्यावर कारमधून आरोपी रमजान खाली उतरला. बिस्मिल्ला यांनी त्याला ओळखले. मार्च २०२३ मध्ये आरोपी रमजानने बिस्मिल्ला यांच्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यास अटक झाली होती.

बिस्मिल्ला व तिन्ही जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी बिस्मिल्ला यांचा दीर व राजू धमगाये गंभीर जखमी असल्याने त्यांना दाखल केले. बिस्मिल्ला यांनी दिलेल्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी आरोपी रमजानविरुद्ध कलम ३०७, ३२३ नुसार गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

हमको मारेगा क्या, कैसे गाडी चलाता है

आरोपी रमजान बिस्मिल्ला यांचा राग करीत होता. बिस्मिल्ला यांनी हमको मारेगा क्या, कैसे गाडी चलाता हे असे म्हटल्याने आरोपी रमजानने कारमधून चाकू काढून बिस्मिल्ला यांचा दीर इकबालच्या पाठीवर वार करून त्यांना जखमी केले. राजू धमगाये हा त्यांना वाचविण्यासाठी गेला असता त्याने राजूवरही हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर बिस्मिल्ला यांनी आपला मुलगा साहिल (वय १९) यास फोन करून बोलावले.

दरम्यान आरोपीने बिस्मिल्ला यांच्या उजव्या हाताला चाकू मारून जखमी केले. त्यांचा मुलगा साहिल आला असता त्याच्यावरही आरोपीने चाकूने वार केला. चाकू हाताने पकडल्याने साहिलच्या बोटांवर चाकू लागून तो जखमी झाला. त्यानंतर आरोपी कार तेथेच सोडून पळून गेला.

Web Title: Four persons, including a woman, were seriously injured in a knife attack in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.