नागपुरात चार विमाने उतरली; ३७८ विमान प्रवासी होम क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 09:35 PM2020-05-28T21:35:49+5:302020-05-28T21:36:14+5:30
लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यानंतर गेल्या काही दिवसापासून घरगुती विमान सेवा सुरू झाली. गुरुवारी चार विमाने नागपुरात आली. या विमानांनी १९६ प्रवासी रवाना झाले तर नागपुरात आलेल्या ३७८ प्रवाशांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ संक्रमणावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले. लॉकडाऊननंतर तब्बल दोन महिन्यानंतर गेल्या काही दिवसापासून घरगुती विमान सेवा सुरू झाली. गुरुवारी चार विमाने नागपुरात आली. या विमानांनी १९६ प्रवासी रवाना झाले तर नागपुरात आलेल्या ३७८ प्रवाशांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सची एकूण चार विमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यामध्ये एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर, इंडिगोचे बेंगळुरू-नागपूर, मुंबई-नागपूर आणि दिल्ली-नागपूर विमानांचा समावेश होता. या विमानातून एकूण ३७८ प्रवासी विमानतळावर उतरले. या सर्व प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केल्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के लावण्यात आले. आता त्यांना १४ दिवस घरीच राहावे लागेल. या चार विमानातून एकूण १९६ प्रवासी संबंधित शहरात रवाना झाले. त्यांचीही थर्मल स्कॅनिंग विमानतळावर करण्यात आली. विमानतळावर कर्मचाऱ्यांसह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी आणि डॉक्टर तैनात होते.