चाेरट्याने घरासमाेरून दुचाकी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:13 AM2021-09-05T04:13:56+5:302021-09-05T04:13:56+5:30

खापरखेडा : घरासमाेर उभी असलेली माेटारसायकल चाेरट्याने भरदिवसा चाेरून नेली. त्या माेटारसायकलची किंमत २० हजार रुपये आहे. ही घटना ...

The four snatched the bike from the house | चाेरट्याने घरासमाेरून दुचाकी पळविली

चाेरट्याने घरासमाेरून दुचाकी पळविली

Next

खापरखेडा : घरासमाेर उभी असलेली माेटारसायकल चाेरट्याने भरदिवसा चाेरून नेली. त्या माेटारसायकलची किंमत २० हजार रुपये आहे. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) येथे नुकतीच घडली.

अमाेल एकनाथ शेंडे (२५, रा. शिवरामनगर, चनकापूर, खापरखेडा, ता. सावनेर) हा त्याचे मालक सुरेश मुरलीधर हरडे, रा. रेल्वेचाैकी, खापरखेडा यांच्या एमएच-४० एच-६०४९ क्रमांकाच्या माेटारसायकलने घरी जेवण करण्यासाठी गेला हाेता. त्याने माेटारसायकल घरासमाेर उभी केली आणि आत गेला. काही वेळात चाेरट्याने ती चाेरून नेली. परिसरात शाेध घेऊन ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे त्याने पाेलिसांत तक्रार दाखल केली. त्या माेटारसायकलची किंमत २० हजार रुपये असल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार सूर्यभान जळते करीत आहेत.

Web Title: The four snatched the bike from the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.