चाेरट्याने रेडिमेड कपडे पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:12 AM2021-08-13T04:12:02+5:302021-08-13T04:12:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : शहरातील सराफा दुकानातील चाेरीप्रकरण ताजे असतानाच चाेरट्याने कुही शहरातील पाेलीस ठाण्यासमाेर असलेल्या रेडिमेड कपड्याच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : शहरातील सराफा दुकानातील चाेरीप्रकरण ताजे असतानाच चाेरट्याने कुही शहरातील पाेलीस ठाण्यासमाेर असलेल्या रेडिमेड कपड्याच्या दुकानात बुधवारी (दि. ११) मध्यरात्री हात साफ केला. यात चाेरट्याने ३०,२९५ रुपये किमतीचे कपडे चाेरून नेल्याची माहिती दुकानदाराने दिली.
प्रदीप थुटे (३७, रा. साळवा, ता. कुही) यांचे कुही शहरातील पाेलीस ठाण्यासमाेर असलेल्या श्री गजानन महाराज मंदिराजवळ रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. कुही येथे बुधवारी आठवडी बाजार असल्याने दुकान दिवसभर सुरूच हाेते. प्रदीप थुटे यांनी रात्री दुकान बंद केले व साळवा येथे घरी निघून गेले. दरम्यान, परिसरात कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दुकानाच्या छताचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला. यात त्याने ३०,२९५ रुपये किमतीचे रेडिमेड कपडे चाेरून नेल्याची माहिती प्रदीप थुटे यांनी पाेलिसांना दिली.
दुकानात चाेरी झाल्याचे गुरुवारी (दि. १२) सकाळी त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ४५७, ३२० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार नामदेव पुजारी, राजेंद्र देशमाने, संदीप गुट्टे करीत आहेत.