मेयोतून निघून जाणाऱ्या त्या चार रुग्णांविरुद्ध तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 09:46 PM2020-03-14T21:46:28+5:302020-03-14T22:35:20+5:30

उपचार न करता मेयोतून निघून गेलेल्या त्या चार कोरोना संशयित रुग्णांविरुद्ध महाराष्ट्र राज्य साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९७ अंतर्गत कलम २, ३, ४ अन्वये तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Four of those patients who are leaving Mayo have been charged | मेयोतून निघून जाणाऱ्या त्या चार रुग्णांविरुद्ध तक्रार दाखल

मेयोतून निघून जाणाऱ्या त्या चार रुग्णांविरुद्ध तक्रार दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपचार न करता मेयोतून निघून गेलेल्या त्या चार कोरोना संशयित रुग्णांवर महाराष्ट्र राज्य साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९९७ अंतर्गत कलम २, ३, ४ अन्वये तहसील पोलीस ठाण्यात तक्रार  दाखल करण्यात आली आहे. दरम्यान कोरानाबाबत सरकारने जे काही दिशानिर्देश दिले आहेत त्यांचे पालन करणे सर्वांचेच कर्तव्य आहे. या आजाराबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. तेव्हा सर्वांनीच सहकार्य करावे, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कळविले आहे.
रुग्णालयातून संशयित रुग्ण बाहेर पडलेच कसे?
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महारोगाईची घोषणा केली आहे. परंतु इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) यांचे गांभीर्य कळले नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी रात्री १०.३० ते १२ वाजताच्या सुमारास चार कोरोना संशयित रुग्ण रुग्णालयातून निघून गेल्याची खळबळजनक घटना घडली. रात्री उशिरापर्यंत या रुग्णांचा शोध सुरू होता.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या व संशयित रुग्णांसाठी मेयोकडे एकच वॉर्ड आहे. २० खाटांच्या या वॉर्डात सध्या एक ४५ वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. शुक्रवारी एकूण सात संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्याच्यापैकी दोन रुग्ण सकाळी वॉर्डात भरती झाले, तर उर्वरिा पाच संशयित रुग्ण सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान वॉर्डात आले. सकाळी आलेल्या दोन रुग्णांचे नमुने त्याचवेळी घेतल्याने रात्री ९ वाजता अहवाल आला. ते निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी जाऊ दिले. संशयित पाच रुग्णांचे नमुने सायंकाळी घेतल्याने त्यांचे नमुने दुसºया दिवशी येण्याची शक्यता होती. परंतु त्यांना सुटी दिली, आम्हाला का नाही, असे म्हणून त्यांनी तेथील डॉक्टरांशी वाद घातला. नंतर रात्री १०.३० ते १२ वाजताच्या सुमारास हे चार संशयित रुग्ण रुग्णालयातून एक-एक करून बाहेर पडले.

संशयितांपैकी दोघांचा बाहेरील देशातून प्रवास
यात ३६ वर्षीय महिला नेदरलँड येथून प्रवास करून आली होती. तिच्यासोबत चार वर्षाचा मुलगा आहे. या मुलाला सर्दी-खोकला असल्याने ती मेयोमध्ये आली. दुसरा संशयित रुग्ण हे ५० वर्षीय आहे. ते थायलँडला गेले होते. तर, इतर दोन संशयितांपैकी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १९ वर्षीय विद्यार्थी तर दुसरी ६० वर्षीय महिला आहे. ती कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करते. अचानक हे चारही रुग्ण कुणाला न सांगताच निघून गेल्याचे कळताच गोंधळ उडाला. डॉक्टरांनी याची माहिती अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया व तहसील पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. परंतु त्यांनी वॉर्डात पॉझिटिव्ह रुग्ण आहे, आम्हालाही कोरोनाची लागण होऊ शकते, असे सांगून रुग्णालयात येण्यास नकार दिला. शनिवारी ही घटना बाहेर येताच, मेयोमध्ये सुरू असलेल्या गलथानपणा समोर आला.

 

Web Title: Four of those patients who are leaving Mayo have been charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.