नागपूर जिल्ह्यातील माहुरझरीत आढळली चार हजार वर्षे जुनी दगडी मण्यांची फॅक्टरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 07:10 AM2021-09-30T07:10:00+5:302021-09-30T07:10:02+5:30

Nagpur News उपराजधानीत झिरो माईलपासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर काटोल मार्गावरील माहुरझरी परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) चार हजार वर्षे जुन्या रंगीत दगडांचे मणी तयार करणाऱ्या फॅक्टरीचा शोध लावला आहे.

Four thousand year old stone bead factory found in Mahurzari in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील माहुरझरीत आढळली चार हजार वर्षे जुनी दगडी मण्यांची फॅक्टरी

नागपूर जिल्ह्यातील माहुरझरीत आढळली चार हजार वर्षे जुनी दगडी मण्यांची फॅक्टरी

googlenewsNext
ठळक मुद्देसंरक्षित क्षेत्र जाहीर होणारपुरातत्त्व विभागाने केले उत्खनन

वसीम कुरेशी

नागपूर : उपराजधानीत झिरो माईलपासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर काटोल मार्गावरील माहुरझरी परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) चार हजार वर्षे जुन्या रंगीत दगडांचे मणी तयार करणाऱ्या फॅक्टरीचा शोध लावला आहे. येथे आभूषणांसाठी दगड घासून मणी तयार केले जायचे. याशिवाय ते विदेशातही निर्यात केले जायचे. येथील उत्खननात अनेक नव्या वस्तू मिळाल्यामुळे याला संरक्षित क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास हे नागपूर सर्कलमधील १४ वे पुरातत्त्व महत्त्व असलेले संरक्षित स्थळ ठरणार आहे. (Four thousand year old stone bead factory found in Mahurzari in Nagpur district)

फेटरीत जुनापानीजवळील माहुरझरीत एका नाल्याजवळ उत्खननात हे स्थळ आढळले आहे. येथे दगडांचे दागिने बनविण्यासाठी कच्चा माल, ते तयार करण्यासाठी विशेष कक्ष, उत्पादनासाठी लागणारी दगडांपासून बनविलेली उपकरणे मिळाली आहेत. ही उपकरणे त्या काळात विदर्भात राहणाऱ्या मानवाच्या कलात्मकतेचे दर्शन घडवितात. सोबतच यावरून दगडांना कलात्मकतेने कोरण्याच्या त्या काळातील मानवाच्या युक्तीचा अंदाज येतो. येथे त्या काळात पुरलेले मानवी सांगाडेही मिळाले आहेत. पाषाणकाळात दगडांवर कोरीव काम करून त्यांना बारीक छिद्र करण्याच्या तंत्राची माहितीही येथे मिळाली, हे सुद्धा उल्लेखनीय ! एएसआयने या प्रकल्पाला सॉल्व्हेजिंग आर्कियालॉजी नाव दिले आहे. नागपूर शहराला लागून असलेल्या या पुरातन स्थळामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

 

‘विदर्भात नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत मेगालिथिक व लोहयुगाच्या संस्कृतीचे स्थान आहे. माहुरझरीचाही यात समावेश आहे. या काळात शिलावर्तुळ तयार करून मृतदेह दफन केले जायचे. त्याचे सांगाडेही मिळाले आहेत. या विषयावर आम्ही अभ्यास केला होता. सध्या काही अवशेष सापडले असून, एएसआयची चमू यावर संशोधनात्मक काम करीत आहे.’

-चंद्रशेखर गुप्त, वरिष्ठ पुरातत्त्व अभ्यासक

रस्ता बनविताना आढळले होते दगड

माहुरझरीत अलीकडच्या काळात रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान रंगीत दगडांंचे दागिने तयार करण्यासाठी कोरण्यात आलेले दगड आणि कच्चा माल एएसआयच्या चमूला आढळला. तीन महिन्यांपूर्वी एएसआयची चमू या ठिकाणी वृक्षारोपणासाठी गेली होती.

Web Title: Four thousand year old stone bead factory found in Mahurzari in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :historyइतिहास