कळमन्यात रेतीचे चार ट्रक पकडले

By admin | Published: November 28, 2014 01:04 AM2014-11-28T01:04:55+5:302014-11-28T01:19:12+5:30

रेती तस्करीचा भंडाफोड करताच महसूल प्रशासन कारवाईसाठी सरसावले. त्यांनी कळमन्यात बुधवारी रेतीचे चार ट्रक जप्त केले. पकडलेली रेती आणि ट्रकसह सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

Four trucks of sand on the Kamman river | कळमन्यात रेतीचे चार ट्रक पकडले

कळमन्यात रेतीचे चार ट्रक पकडले

Next

४० लाखांचा माल जप्त : महसूल प्रशासनाची कारवाई
नागपूर : रेती तस्करीचा भंडाफोड करताच महसूल प्रशासन कारवाईसाठी सरसावले. त्यांनी कळमन्यात बुधवारी रेतीचे चार ट्रक जप्त केले. पकडलेली रेती आणि ट्रकसह सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील रेती घाटावरून रेतीची चोरी करून वाळू माफिया या रेतीची बिनबोभाट तस्करी करतात. एका रात्रीत ३०० ते ४०० ट्रक चोरीची रेती विकून वाळू माफिया दररोज सुमारे ५० लाख रुपयांची कमाई करतात. यातून मोठा हिस्सा पोलीस, आरटीओ आणि महसूल प्रशासनातील काही अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांच्या खिशात जातो.
लोकमतने मंगळवारी आणि बुधवारी याबाबतचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले. यामुळे संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली. ‘प्रशासनातील मित्रांनी’ दिलेल्या सल्ल््यानुसार वाळू माफियांनी मंगळवारी आणि बुधवारी दिवसभर रेतीची वाहतूक करण्याचे टाळले. आपले ठिय्येसुद्धा बदलवले. तथापि, त्यांनी रात्रभर रेतीची वाहतूक सुरूच ठेवली.
पोलीस, आरटीओचे
हात बांधलेलेच
महसूल प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे पोलिसांनी संबंधित ट्रकचालकांवर गुन्हे दाखल केले. तथापि, पोलीस किंवा आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचे हात बांधले असल्याची चर्चा आता उघडपणे केली जात आहे.

Web Title: Four trucks of sand on the Kamman river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.