चाेरट्यांनी उपटली पऱ्हाटीची झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:12 AM2021-09-17T04:12:59+5:302021-09-17T04:12:59+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बाजारगाव : चाेरट्यांनी शेतातील घरात ठेवलेल्या रासायनिक खताच्या बॅगा चाेरून नेण्यासाेबत शेतातील पऱ्हाटीची झाडे उपटून फेकली. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बाजारगाव : चाेरट्यांनी शेतातील घरात ठेवलेल्या रासायनिक खताच्या बॅगा चाेरून नेण्यासाेबत शेतातील पऱ्हाटीची झाडे उपटून फेकली. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव नजीकच्या सावंगा शिवारात घडली असून, बुधवारी (दि. १५) सकाळी उघडकीस आली.
लहू कळपाते, रा. सावंगा यांंची सावंगा शिवारात शेती असून, त्यांनी यावर्षी शेतात कपाशीची लागवड केली. ते बुधवारी सकाळी शेतात गेले असता, त्यांच्या शेतातील पऱ्हाटीची झाडे माेठ्या प्रमाणात उपटून फेकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाय, शेतातील घरात ठेवलेल्या रासायनिक खताच्या तीन बॅगाही गायब दिसल्या.
परिणामी, चाेरट्यांनी हा प्रकार साेमवारी (दि. १३) मध्यरात्री केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच तलाठी बांबाेळे यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेवरून लहू कळपाते यांनी पाेलिसात तक्रारही दाखल केली. त्या अनुषंगाने हेड कॉन्स्टेबल बाबुलाल राठोड, कॉन्स्टेबल माधव गुट्टे व प्रभाकर कडू यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.