सराईत वाहन चाेरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:09 AM2021-03-16T04:09:46+5:302021-03-16T04:09:46+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : दुचाकी चाहने चाेरून नेणाऱ्या दाेघांना अटक करण्यात कामठी (जुनी) पाेलिसांना यश आले. दाेघेही सराईत ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : दुचाकी चाहने चाेरून नेणाऱ्या दाेघांना अटक करण्यात कामठी (जुनी) पाेलिसांना यश आले. दाेघेही सराईत वाहनचाेर असून, त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्याची माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. ही कारवाई रविवारी (दि. १४) रात्री ९ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
कृतांत सिद्धार्थ डोंगरे (२४, रा. नागसेनगर, कामठी) व अक्षय गोपीचंद शेंडे (२३, रा. शास्त्री वाॅर्ड, वरठी, जिल्हा भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्या वाहन चाेरांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी गजानन संपतराव वैद्य (४५, रा. हनुमानपुरा, पेरकीपुरा, कामठी) यांच्या घरासमोर त्यांच्या मालकीची एमएच-४०/एडब्ल्यू-२०९९ क्रमांकाची बुलेट २६ फेब्रुवारीच्या रात्री चाेरीला गेली हाेती. त्यांच्या तक्रारीवरून कामठी (जुनी) पाेलिसांनी भादंवि ३७९, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून तपासाला सुरुवात केली.
ही माेटरसायकल कृतांतने चाेरून नेली. त्यासाठी त्याने बनावट चावीचा वापर केला तसेच त्या माेटरसायकलची वरठी (जिल्हा भंडारा) येथे विल्हेवाट लावली, अशी माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. दरम्यान, कृतांत कामठी शहरात असल्याचे कळताच पाेलिसांनी त्याला रविवारी सकाळी ताब्यात घेत चाैकशी सुरू केली. त्याने गुन्ह्याची कबुली देताच वरठी येथून ती बुलेट ताब्यात घेतली. एवढेच नव्हे तर, त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीची एमएच-४०/बीव्ही-९५७३ क्रमांकाची डीओ, एमएच-४९/डब्ल्यू-२४९८ क्रमांकाची ॲक्टिव्हा जप्त केली.
शिवाय, अक्षयलाही अटक केली. त्या दाेघांकडून वाहन चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यता ठाणेदार विजय मालचे यांनी व्यक्त केली. ही कामगिरी हेडकॉन्स्टेबल राजेश पाली, संजय गीते, प्रशांत सलाम, अशपाक अन्सारी, पवन गजभिये, अंकुश गजभिये, विजय सिन्हा, विवेक श्रीपाद यांच्या पथकाने केली.