चार वर्षीय बालिकेवर अत्याचार, विधिसंघर्षग्रस्त बालकाची बालसुधारगृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 10:44 AM2021-10-19T10:44:37+5:302021-10-19T11:25:44+5:30
विधिसंघर्षग्रस्त बालक पीडित बालिकेच्या शेजारी राहताे. त्याने त्याच्या सात वर्षीय बहिणीच्या माध्यमातून पीडित बालिकेला फिशपाॅट बघण्याच्या निमित्ताने घरी बाेलावले हाेते. त्याने खाेलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व नंतर तिला तिच्या घरी साेडून दिले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चार वर्षीय बालिकेवर १४ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने अत्याचार केल्याची घटना कामठी शहरातील रामगड भागात रविवारी (दि. १७) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पाेलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेत त्याची नागपूर येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
विधिसंघर्षग्रस्त बालक पीडित बालिकेच्या शेजारी राहताे. त्याने त्याच्या सात वर्षीय बहिणीच्या माध्यमातून पीडित बालिकेला फिशपाॅट बघण्याच्या निमित्ताने घरी बाेलावले हाेते. त्याने खाेलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व नंतर तिला तिच्या घरी साेडून दिले. रक्तस्राव हाेत असल्याने आईने विचारणा करताच ती साेफ्यावरून पडल्याचेही त्याने तिच्या आईला सांगितले.
आईने तिला लगेच जवळच्या खासगी डाॅक्टरकडे नेले. प्रथमाेपचार केल्यानंतर डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला नागपूर येथील मेयाे रुग्णालयात भरती करण्यात आले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे प्राथमिक वैद्यकीय तपासणीत स्पष्ट हाेताच आईने पाेलिसात तक्रार नाेंदविली. पाेलिसांनी लगेच विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेत त्याची न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर येथील बालसुधारगृहात रवानगी केली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३७६, पाेक्साे ॲक्ट २०१२, सहकलम (४), (६) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर करीत आहेत.