चार वर्षांत ंिकं मत दीड कोटीने वाढली
By admin | Published: January 17, 2016 02:52 AM2016-01-17T02:52:56+5:302016-01-17T02:52:56+5:30
आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेला प्रस्ताव दिरंगाईमुळे मूल्यवृद्धीचा फटका सहन करावा लागणार आहे.
टीटीएलचा खर्च वाढला : अर्ध्या किमतीत उपकरणे
नागपूर : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या महापालिकेला प्रस्ताव दिरंगाईमुळे मूल्यवृद्धीचा फटका सहन करावा लागणार आहे.
अग्निशमन विभागासाठी ४२ मीटर उंचीची टर्न टेबल लँडर (टीटीएल) खरेदीत हा प्रकार घडला आहे. गेल्या चार वर्षापासून हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने आता सुधारित प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.
सुधारित प्रस्तावात टीटीएलची किंमत ७.५० क ोटी आहे. आधीच्या प्रस्तावात ६ कोटी होती. त्यामुळे ही खरेदी महागात पडण्याची शक्यता आहे.
४२ मीटर उंचीवरील आग नियंत्रणात आणण्याची क्षमता असलेली टीटीएल १७.१ टक्के कमी दराने खरेदी करणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. आॅस्ट्रीयातील मे. रोजेनबर इंटरनॅशनल कंपनीकडून ही यंत्रसामुग्री खरेदी करणार आहेत.
परंतु सिपींग, क्लिअरन्स, हँडंिलग, ट्रान्सपोर्ट व आयात शुल्क यासह या यंत्रसामुग्रीची किंमत ७.५० कोटींवर जाणार आहे.
वास्तविक सुरुवातीच्या प्रस्तावानुसार टीटीएलची त्यावरील खर्चासहीत किंमत ५ क ोटी ३ लाख ४२ हजार होती. त्यामुळे महापालिकेला अधिक किमतीने ती खरेदी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)