दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये चौथ्यांदा लागेल शुल्क
By admin | Published: October 26, 2014 12:18 AM2014-10-26T00:18:23+5:302014-10-26T00:18:23+5:30
एटीएमची सेवा पूर्वी मोफत स्वरूपात होती. त्यामुळे याचा वापर कितीही वेळ केला तरी काही काळजी नव्हती. मात्र १ नोव्हेंबर २०१४ पासून ही सेवा वापरण्यासाठी एका लिमिटनंतर शुल्क आकारले जाणार आहे.
१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी
नागपूर : एटीएमची सेवा पूर्वी मोफत स्वरूपात होती. त्यामुळे याचा वापर कितीही वेळ केला तरी काही काळजी नव्हती. मात्र १ नोव्हेंबर २०१४ पासून ही सेवा वापरण्यासाठी एका लिमिटनंतर शुल्क आकारले जाणार आहे. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून चौथ्यांदा व्यवहार केल्यास त्या एटीएमच्या वापरासाठी ठराविक शुल्क अदा करावे लागणार आहे. हे शुल्क वाचवायचे असेल तर खाते असलेल्या बँकेच्या एटीएम कार्डचा वापर करा.
मार्केटमध्ये काहीही खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुमच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करा. यामुळे तुम्हाला तुमच्याकडे कॅश बाळगण्याची गरज पडणार नाही. हेही ध्यानात ठेवले पाहिजे की कार्डचा जास्त वापरसुद्धा महागात पडू शकतो.
खाते असलेल्या बँकेचे एटीएम
पैसे काढण्यासाठी तुमचे खाते असलेल्या बँक एटीएमचाच वापर करा. जर तुमचे खाते असलेले बँक एटीएम बंद असेल तरच दुसऱ्या बँक एटीएमचा वापर करा. काही बँकांचे मोबाईल अॅपसुद्धा आहेत, जे तुम्हाला त्यांचे एटीएम कोणत्या भागांत आहेत याची माहिती पुरवतात.
एसएमएस, फोन बँकिंग
बिगर व्यावसायिक माहिती मिळवण्यासाठी शक्यतो फोन बँकिंग व एसएमएस सेवांचा वापर करा. उदा. बॅलन्स इन्क्वायरी, चेक स्टेटस, मिनी स्टेटमेंट. जेणेकरून एटीएमचा वापर करावा लागणार नाही. (प्रतिनिधी)
गरजेसाठीच काढा कॅश
काही अत्यावश्यक काम असेल तरच त्यासाठी लागतील तेवढे पैसे घरी ठेवा. खूप मोठी रक्कम जवळ बाळगू नका. एटीएम वापरासाठी लागणारे २० रुपये वाचवण्याच्या नादात तुम्ही आधीच पैसे काढून ठेवले तर त्या पैशांवर मिळणारा इंटरेस्ट तुम्ही घालवू शकता. त्यामुळे हवे तेवढेच पैसे काढा.