शहरात सलग चौथ्या दिवशी एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:28+5:302021-06-22T04:07:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात सलग चौथ्या दिवशी कोरोनाने कुणाचाही मृत्यू झालेला नाही. तर नागपूर ग्रामीणमध्ये सात दिवसांनंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात सलग चौथ्या दिवशी कोरोनाने कुणाचाही मृत्यू झालेला नाही. तर नागपूर ग्रामीणमध्ये सात दिवसांनंतर सोमवारी एका मृत्यूची नोंद झाली, तसेच जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचाही मृत्यू झाला. जिल्ह्यात सोमवारी ३३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. नागपुरात सातत्याने संक्रमण कमी-कमी होत आहे. आतापर्यंत एकूण ४,७६,७९४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ९०१९ मृत्यू झाले आहेत.
सोमवारी आढळून आलेल्या संक्रमित रुग्णांमध्ये शहरातील २१, ग्रामीणचे ११ आणि जिल्ह्याबाहेरच्या एकाचा समावेश आहे. सोमवारी १३६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले. यासोबतच ४,६६,९७३ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट ९७.९४ टक्केवर पोहोचला आहे. जिल्ह्यात सोमवारी एकूण ५५३३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील ४९९९ आणि ग्रामीणचे ५३४ आहेत. आतापर्यंत एकूण २९.९८ लाखापेक्षा अधिक नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
बॉक्स
८०२ रुग्ण सक्रिय
नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ८०२ वर आली आहे. यात शहरातील ७६९ आणि ग्रामीणचे केवळ ३३ रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये ५८३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर २१९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या मेडिकलमध्ये ५७ रुग्ण, मेयोमध्ये १०, एम्समध्ये ११, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ३, आयसोलेशन रुग्णालयात ३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. उर्वरित खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
एक्टिव ८०२
बरे झालेले ४,६६,९७३
मृत ९०१९