सलग चौथ्या दिवशी ग्रामीणमध्ये शून्य रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:11 AM2021-08-23T04:11:49+5:302021-08-23T04:11:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असून मागील दहा दिवसांपासून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असून मागील दहा दिवसांपासून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. रविवारी ग्रामीणमध्ये सलग चौथ्या दिवशी एकही रुग्ण आढळला नाही, तर नागपूर शहरात दोन नवे बाधित सापडले. जिल्ह्यातील बाधितांचा दर ०.०५ वर आला आहे.
रविवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात ४ हजार ३४४ चाचण्या केल्या. त्यातील ३ हजार ३३६ चाचण्या शहरात, तर १ हजार ८ चाचण्या ग्रामीण भागात केल्या. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४ लाख ९२ हजार ९८८ वर पोहोचला आहे. यात शहरातील ३ लाख ४० हजार ४८, तर ग्रामीणमधील १ लाख ४६ हजार १२४ जणांचा समावेश आहे. तसेच एकूण मृत्यूसंख्या १० हजार ११८ वर स्थिर आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात ८२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ७५ शहरातील, तर ७ ग्रामीण भागातील आहेत. सक्रिय रुग्णांतील ४५ जण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून ३७ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रविवारी शहरातील ९ जणांसह जिल्ह्यात कोरोनाचे १२ रुग्ण बरे झाले.
- कोरोनाची रविवारची स्थिती...
दैनिक चाचण्या : ४,३४४
शहर : २ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,९२,९८८
- सक्रिय रुग्ण : ८२
- बरे झालेले रुग्ण : ४,८२,७८८
- मृत्यू : १०११८