तुकडेबंदीमुळे बजेटमधील घर महागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:05+5:302021-09-02T04:19:05+5:30

मोठ्या जागा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. ...

Fragmentation will make budget house more expensive! | तुकडेबंदीमुळे बजेटमधील घर महागणार!

तुकडेबंदीमुळे बजेटमधील घर महागणार!

Next

मोठ्या जागा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता अकृषक जमिनीचे (एनए प्लॉट) तुकडे पाडून खरेदी-विक्री करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक आहे. यामुळे घराच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

...

असा आहे नोंदणी व मुद्रांक विभागाचा निर्णय

-एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्याच सर्व्हे नंबरमधील तुम्ही एक, दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असाल, तर त्यांची दस्तनोंदणी होणार नाही. मात्र, त्याच सर्व्हे नंबरचा ले-आऊट करून त्यामध्ये एक, दोन गुंठ्याचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्तनोंदणी होऊ शकणार आहे.

- यापूर्वीच ज्या पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकड्याची खरेदी घेतली असेल, अशा तुकड्याच्या खरेदी-विक्री व्यवहारासाठीसुद्धा कायद्यानुसार सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.

- एखादा अलहिदा निर्माण झालेल्या तुकड्याची शासन भूमिअभिलेख विभागामार्फत हद्द निश्चित होऊन, मोजणी होऊन त्याचा स्वतंत्र हद्द निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. अशा स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या तुकड्याच्या विभाजनास वरील अटी व शर्ती लागू राहतील.

....

शेतकरी अडचणीत येईल

जर एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असेल आणि खरेदी करायची असेल आणि जमीन २० गुंठ्यापेक्षा कमी असेल तर खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज लागणार आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येईल.

-विजय मालवीय

...

भ्रष्टाचार वाढण्यास मदत

जिरायत, बागायत जमीन खरेदीसाठी राज्य सरकारने नवे नियम लागू केले आहेत. जमीन खरेदी-विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेताना भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे.

- संतोष गड्डमवार

.....

Web Title: Fragmentation will make budget house more expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.